कोमल पवारच्या मृत्यूचा उदयनराजेंना चटका.... - Komal Pawar's death touches Udayan Raje's mind .... | Politics Marathi News - Sarkarnama

कोमल पवारच्या मृत्यूचा उदयनराजेंना चटका....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

"प्लमोनरी हायपरटेन्शन" या आजाराचे निदान झाल्यानंतर त्याच्याशी झुंज देणाऱ्या कोमल पवार गोडसे हिचा संघर्ष त्यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून मांडला आहे. कोमल ही महाराष्ट्रातील दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली पहिली व्यक्ती आहे. पण, काही दिवसांपूर्वीच तिचा आजार बळावला आणि या गोष्टींनी
नको तेच वळण घेतलं.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी एका आज एक भावनिक पोस्ट आपल्या फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. एका खास व्यक्तीच्या निधनाचं दु:ख व्यक्त करून तिच्या जाण्याने केवळ सातारकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत वाईट बातमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कोमल ही आपल्या लहान बहिणीप्रमाणे असल्याचं म्हणत उदयनराजे यांनी तिच्यासोबतचा एक फोटोही फेसबुकवर पोस्ट केला आहे. या फोटोसह त्यांनी लिहिलंय, 'सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी आहे. सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार - गोडसे हीला २०१७ साली "प्लमोनरी हायपरटेन्शन" या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले.

"प्लमोनरी हायपरटेन्शन" या आजाराचे निदान झाल्यानंतर त्याच्याशी झुंज देणाऱ्या कोमल पवार गोडसे हिचा संघर्ष त्यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून मांडला आहे. कोमल ही महाराष्ट्रातील दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली पहिली व्यक्ती आहे. पण, काही दिवसांपूर्वीच तिचा आजार बळावला आणि या गोष्टींनी
नको तेच वळण घेतलं.

पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. महाराष्ट्रातील पहिली "दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण" झालेली कोमल ही पहिली व्यक्ती ठरली होती. पण तीन दिवसांपूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.

साताऱ्यातील कोमल पवार ही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच आजारी पडली. विविध ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले. पण, आजाराचं स्वरुप अधिकच गंभीर
होत गेल्यामुळं तिला फुफ्फुसं आणि हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला. साताऱ्यातील अनेकजण आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीच्या ओघानं कोमलवर
उपचार झाले. तिनं मृत्यूवर बऱ्यात अंशी मात केली.

अवयवदानामुळं हे साध्य होऊ शकवलं होतं. ज्यामुळं पुढे जाऊन पतीसह तिनं 'कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन' ही संस्था सुरु करत गरजूंना मदतीचा हात पुढे केला होता. कोमल मात्र, एक नवी सुरुवात करुन साऱ्यांचाच निरोप घेऊन गेली. तिला सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहत तिच्या कार्याला दाद दिली जात आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख