केंद्रातील मंत्र्यांना शेती कशी करायची हे तरी माहिती आहे का..... - Do the Union Ministers know how to do agriculture says Satvashila Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रातील मंत्र्यांना शेती कशी करायची हे तरी माहिती आहे का.....

हेमंत पवार
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

सत्वशीला चव्हाण म्हणाल्या, मी माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणुन नाही, तर शेतकरी म्हणुन आंदोलनास आले आहे. आमचीही शेती आहे. शेती कशी करायची हे तर कायदे करणाऱ्यांना माहिती आहे का ? असा सवाल मोदी सरकारला करुन त्या म्हणाल्या, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे ऐेकण्याच्या मनस्थितीत नाहीत. केंद्रातील सर्व मंत्री बहिरे झाले आहेत.

कराड : लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी फुकट भाजीपाला वाटला. मात्र, त्याची केंद्र सरकारला पर्वा नाही. केंद्रातील मंत्र्याना संवेदनशीलता राहिलेला नाही. हे कायदे आदानी, आंबांनी यांच्या फायद्याचे आहेत की शेतकऱ्यांच्या, असा प्रश्न उपस्थित करून कायदे करणाऱ्यांना शेती कशी करायची हे तरी माहित आहे का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

 केंद्राने आणलेल्या या कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला असून  तो न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   केंद्र सरकारने लागु केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि कायदे रद्द व्हावे य मागणीसाठी सर्व शेतकरी संघटना व सर्व पक्षांच्यावतीने आज कराडातील कोल्हापुर नाक्यावर 'चक्काजाम' आंदोलन करण्यात आले.

त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला, देवानंद पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, शशीराज करपे, अनिल घराळे, प्रमोद जगदाळे, ॲड. समीर देसाई, संभाजी जगताप, उत्तमराव खबाले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले. काही वेळ आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सत्वशीला चव्हाण म्हणाल्या, मी माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणुन नाही, तर शेतकरी म्हणुन आंदोलनास आले आहे. आमचीही शेती आहे. शेती कशी करायची हे तर कायदे करणाऱ्यांना माहिती आहे का ? असा सवाल मोदी सरकारला करुन त्या म्हणाल्या, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे ऐेकण्याच्या मनस्थितीत नाहीत. केंद्रातील सर्व मंत्री बहिरे झाले आहेत.

काँग्रेस व इतर पक्षांनी देशाची ७० वर्षात बांधणी केली. ती पाडुन टाकण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. या सरकारने कोणताही चांगला कायदा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी फुकट भाजीपाला वाटला. मात्र, त्याची केंद्र सरकारला पर्वा नाही. केंद्रातील मंत्र्यात संवेदशीलताच राहिलेला नाही.

हे कायदे आदानी, आंबांनी यांच्या फायद्याचे आहेत की शेतकऱ्यांच्या ? कायदे करणाऱ्यांना शेती कशी कायची हे माहित आहे का. या विरोधात  शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तो न्याय  मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. पंजाबराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्राने तीन कायदे आणुन शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे.

त्याविरोधात देशात चक्काजाम आंदोलन होत आहे. देशातील शेतकरी ७५ दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. लाखो शेतकरी आंदोलनात आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांची दखल घेत नाही. ही खेदजनक बाब आहे. उलट शेतकरी येवु नयेत म्हणुन रस्त्यावर खीळे टाकले जात आहेत, ही देशाची लोकशाही आहे का, असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख