`रुपाली चाकणकर यांनीच प्रवीण दरेकर यांची माफी मागावी...`

दरेकर यांचे वक्तव्य बोलीभाषेतील होते, असा दावा भाजप नेते करत आहेत..
`रुपाली चाकणकर यांनीच प्रवीण दरेकर यांची माफी मागावी...`
Praveen Darekar_Chakankar.

शिक्रापूर : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी शिरूर येथे केलेल्या एका वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) त्यांच्या तोंडाला रंगविण्याचा इशारा दिला होता. मात्र या वादात जिथे कार्यक्रम झाला त्या शिरुरच्या वैजयंता चव्हाण (Vaijayant Chavan, Shirur) यांनी उडी घेत दरेकरांचे समर्थन करीत चाकणकरांनाच महिलांचा अपमान केलाय, म्हणून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

वैजयंता चव्हाण यांनी आपल्या म्हणण्याचा व्हिडीओ व्हायरल करून म्हटले आहे की, आमचे नेते दरेकर साहेब हे शिरुरमध्ये येवून महिलांबद्दलच बोलले असे तुम्हाला वाटणे हेच तुमच्या ढासळलेल्या मानसिकतेचे दर्शन आहे. दरेकर साहेबांनी त्या संपूर्ण वक्तव्यात कुठेही महिला किंवा तशा अर्थाचा शब्द देखील उच्चारला नव्हता. 'राष्ट्रवादी पक्ष हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बॅंकवाल्यांचा आहे.. ' असे ते म्हणाले, मात्र त्या गंभीर वास्तवाबद्द्ल बोलायचे सोडून तुम्ही हा विषय
महिलांकडे कसा वळविलात असाही त्यांनी चाकणकरांनाच प्रश्न केला आहे.

राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. त्याचा शब्दशः अर्थ असा की काजू बदाम आणि सुकामेवा खावून-खावून तुमच्या कारखानदार नेत्यांचे, सुभेदारांचे, बॅकवाल्यांचे गाल कसे रंगलेत आणि त्यांनाच राष्ट्रवादी कसा जवळ करतो, अशा अर्थाने दरेकर बोलले होते. त्यांचे वक्तव्य चांगलेच झोंबल्याने चाकण करांनी दरेकरांचे वक्तव्य भेट महिलांशी जोडून चाकणकर ताईंनी समस्त महाराष्ट्रातील महिलांचा घोर अपमान केला आहे. दरेकरांच्या भाषणात कुठलाही महिलांचा उल्लेख नसताना चाकणकरांनी जो पोरकटपणा दाखवून दरेकरांचे वक्तव्य महिलांशी जोडले याबद्दल चाकणकरताईंनी  आता संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी. दरेकर यांचा कार्यक्रम हा शिरुरमध्ये झाला होता. त्यामुळे आम्ही संपूर्ण शिरुरकर महिला आता चाकणकरताईंचा जाहिर निषेध करतो असे म्हणत वैजयंता चव्हाण यांनी रुपाली चाकण करांना दरेकरांचे वक्तव्य पुन्हा पाहण्यासही सांगितले.

Related Stories

No stories found.