धमकी देणाऱ्याचा फोन नंबर सक्षणा सलगरांनी केला व्हायरल

भाजप आणि राष्ट्रवादीतील टीकाटिप्पणी वाढली...
sakshana salgar
sakshana salgar

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादात कार्यकर्तेही उतरले आहेत. एकमेकांच्या विरोधात टोकाची टीका केल्यानंतर एका कार्यकर्त्याने मात्र मान खाली जाईल, असे कृत्य केले.

राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर यांना फोन करून धमकी देण्यात आली. ``मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता,`` असे त्यांनी ट्विट देऊन जाहीर केले.

गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नाही, असा टोला सलगर यांनी टीका करताना लगावला होता. त्यावरून त्यांना धमकी देण्यात आली असावी. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे गृहखाते असल्याने आता सलगर यांच्या तक्रारीची कशी दखल घेतली जाते, हे स्पष्ट होईल. सलगर या उस्मानाबद जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तसेच फर्ड्या वक्त्या आहेत.

पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरात दोन दिवासंपूर्वी हल्ला झाला होता. त्यावरून पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यानंतर सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाली होती. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते दोन्ही बाजूंनी भिडले होते. 

म्हणून मी टाकला दगड

‘‘मी कोणाच्याही सांगण्यावरून नव्हे तर माझ्या स्वत:च्या प्रसिद्धीसाठीच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकला', असे संशयित आरोपी अमित सुरवसेने पोलिसांना सांगितले. तर "मला काहीच माहिती नव्हते, अमित चल म्हणाला म्हणून मी त्याच्यासोबत गेलो होतो,' अशी कबुली नीलेश  क्षीरसागर याने दिली.  (Gopichand Padalkar's car attacked for publicity : Amit Survase)

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी या दोघांना शनिवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यासंदर्भात आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम दिली.

आमदार गोपीचंद पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी 30 जून रोजी सोलापुरात आले होते. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर नाराज होऊन अमितने दगडफेकीचा प्लॅन केला, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास सुरू केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com