पुण्यातील आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या IAS रूबल अग्रवालांवर शुभेच्छांचा वर्षाव

रुग्णालयातील बेडसची माहिती देणारा डॅश बोर्ड तयार करण्यासाठी अग्रवाल यांचा पुढाकार..
Rubal Agrawal
Rubal Agrawal

पुणे : कोरोनाच्या साथीत पुणेकरांच्या आरोग्य व्यवस्थेत  दीड वर्ष झटणाऱ्या पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची बदली एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदावर झाली आहे. त्यांची बदलीबद्दल अनेका पुणेकरांनी त्यांना शुभेच्छा आणि निरोपही दिला. 

महापालिकेत १ जानेवारी २०१९ पासून अग्रवाल या अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पहिले वर्षभर त्यांच्याकडे विविध खाते होती. मात्र, गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाची लाट येताच या आजाराच्या व्यवस्थापनाचीही जबाबदारी त्यांच्याकडे आली. कोरोनाचा संसर्ग पसरत असतानाच अगदी झोपडपट्यांपासून गल्लीबोळ पालथा घालून अग्रवाल यांच्या रुग्णांची सोय करीत राहिल्या. याच काळात रुग्णांवरील उपचार व्यवस्था व्यापक करण्यासाठी थेट रुग्णालयांत जाऊन बेड ताब्यात घेत होत्या. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

रुग्णांवरील मोफत उपचाराची सोय असलेल्या जम्बो, बाणेर कोविड हॉस्पिटलच्या उभारणीत अग्रवाल आघाडीवर होत्या. त्यामुळे किमान वेळेत या व्यवस्थाही सक्षम झाल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अग्रवाल यांनी तेवढ्याच क्षमतेने जबाबदारी पार पाडून पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अग्रवाल यांच्या कामाला पुणेकरांची पसंती मिळाली. आरोग्य व्यवस्थेवरील आपली पकड मजबूत केलेल्या अग्रवाल यांनी गेल्या चार महिन्यांत पुण्यात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटलही उभे केले. त्यामुळे पुणेकरांना आता कायमस्वरुपी आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या.

कामात बेजबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगाही त्यांनी उगारला आहे. परदेशात आलेल्या आणि कोरोना तपासणी न केलेल्या, होम क्वॉरंटाइनकडे पाठ फिरविलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने अग्रवाल चर्चेत आल्या. या कारवाईला विरोध होऊनही अग्रवाल यांनी निलंबनाचा आदेश काढला. यानिमित्ताने अग्रवाल यांनी महापालिका वर्तुळात आपल्या कामाची दहशत निर्माण केली. पणे महापालिकेतील अडीच वर्षांच्या सेवेनंतर अग्रवाल यांची मंगळवारी नवी मुंबईत बदली झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मंडळींनी बुधवारी सकाळपासून त्यांच्या दालनात गर्दी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com