शेकापचे नेते जयंत पाटील यांना मातृशोक : सुलभाकाकू पाटील यांचे निधन - Sulbhakaku Patil, mother of Jayant Patil no more | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

शेकापचे नेते जयंत पाटील यांना मातृशोक : सुलभाकाकू पाटील यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 15 मे 2021

शेकापच्या कार्यकर्त्यांचा आधार म्हणून सुलभाकाकूंची ओळख होती... 

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते प्रभाकर पाटील यांच्या पत्नी सुलभा पाटील (वय ९२) यांचे पेझारी येथील निवासस्थानी शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, (PWP leader Jayant Patil) माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, अ‍ॅड. राजन पाटील, सुनंदा पाटील यांच्या त्या मातोश्री असून त्या सुलभाकाकू म्हणून परिचित होत्या. (Sulbha Patil dies due to old age)

शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनमुळे त्यांच्या पार्थिवावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पेझारी येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील, राजन पाटील, सुनंदा पाटील, विकास पाटील, सुप्रिया पाटील, भावना पाटील, अ‍ॅड. नीता पाटील, आस्वाद पाटील, नृपाल पाटील, सवाई पाटील, निनाद पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील, सिद्धाली पाटील, सुमना पाटील आदी नातेवाईक उपस्थित होते. सध्याच्या लॉकडाऊनमुळे सांत्वनासाठी कुणीही घरी न येता मोबाईलवरूनच सांत्वन करावे, असे आवाहन पाटील कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

सुलभा पाटील यांना विविध नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

सुनिल तटकरे, खासदार :  सुलभाकाकू यांच्या निधनाने शेकापचा मोठा आधार नाहीसा झालाय.त्यांची उणिव आम्हाला सातत्याने जाणवत राहणार आहे.राजकीय नेत्याला घरातील कुटुंबियांचा आधार असावा लागतो.तो सुलभाकाकूंच्या रुपाने पाटील परिवाराला मिळाला होता.आदरातिथ्य हा काकूंचा  विशेष गुण,त्यामुळे घरी आलेल्या प्रत्येकाचे आपुलकीने स्वागत होत असे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

आमदार बाळाराम पाटील :सुलभाकाकू म्हणजे समस्त पाटील परिवारासह शेकापमधील सर्वांसाठी आपुलकीचा झरा होता.त्यांच्याकडे येणारा प्रत्येकजण विन्मुख होऊन कघीही परत जात नसे.त्यामुळे त्यांच्याविषयी नेहमीच सर्वांना आपुलकी वाटत आली.ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील यांच्यासह जयंत पाटील,मीनाक्षी पाटील,पंडित पाटील यांच्या राजकीय,सामाजिक जीवनातही काकूंनी यशस्वीपणे साथ दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख