मी महिलांची माफी मागण्याचा प्रश्नच नाही : इंदोरीकर 

माझे कोणीही समर्थक नसल्याचा इंदोरीकरांचा दावा
indorikar maharaj
indorikar maharaj

पुणे : मी महिलांचा अपमान कधीही केला नाही. तसेच तृप्ती देसाईंना  धमक्या दिलेल्या कोणत्याही  समर्थकास ओळखत नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही, असे प्रत्युत्तुर प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांनी दिले आहे. 

इंदोरीकर महाराजांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध तृप्ती देसाई यांनी टीका केली होती. तसेच गर्भलिंगाबद्दल अंधश्रद्धा पसरविण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावरून सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. महाराजांवर टीका केली म्हणून देसाई यांना धमक्या देणारे अनेक दूरध्वनी आले होते.

या पार्श्वभूमीवर तृप्ती  देसाई यांनी इंदोरीकरांना वकील अॅड मिलिंद पवार यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस दिली होती. महिलांची जाहीर माफी मागावी व पुन्हा अशी व कतव्ये करणार नाही, असे जाहीर करण्याची मागणी केली होती. देशमुख यांच्या  समर्थकांनी  तृप्ती देसाई  यांना  फोन करून जीवे मारण्याची धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

यावर इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की इंदोरीकर हे त्यांच्या कोणत्याही समर्थकांना ओळखत नाहीत. काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील तर  त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही. देशमुख यांनी आजपर्यंत कधीच किर्तनातून महिलांना अपमानीत होईल किंवा  महिलांचा अनादर होईल असे वकव्य किंवा अंधश्रद्धा पसरेल असे वकव्य जाहीर  कीर्तनातून कधीही केलेले नाही. त्यामुळे महाराजांनी महिलांची जाहीर माफी मागावी, असे निवृत्ती महाराज देशमुख यांना वाटत नाही किंवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.

या प्रत्युत्तरावर देसाई म्हणाल्या की स्वतःला महाराज समजणारे इंदोरीकर इतके खोटे बोलत असतील यावर विश्वासच बसत नाही. ही लढाई न्यायालयात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com