SP तेजस्वी सातपुते यांचा दणका : पैसे घेऊन वाहने सोडणारे चार पोलिस निलंबित - SP tejswee Satpute suspends four police in Solapur district | Politics Marathi News - Sarkarnama

SP तेजस्वी सातपुते यांचा दणका : पैसे घेऊन वाहने सोडणारे चार पोलिस निलंबित

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 8 मे 2021

अशा चुकार पोलिसांवर कठोर कारवाई हवी...

सोलापूर : कोरोनाच्या संकटात प्रशासकीय यंत्रणा एकीकडे जनतेला दिलासा देण्याचे काम करत असताना दुसरीकडे काही अपप्रवृत्तींमुळे या प्रतिमेला मोठा तडा जात आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला. (IPS Tejswee Satpute)

लॉकडाऊनमध्ये नाकाबंदीत (Corona Lockdown in Solapur) वाहने बाहेर पडू नयेत, असा नियम आहे. मात्र काही नागरिकांनी तसे केल्यास त्यांच्याकडून चिरीमिरी घेण्याचे आणि वाहन सोडण्याचे प्रकार चालू ठेवून पोलिसांनी इतर नागरिकांच्याही जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अशा नाठाळ कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली. विशेष म्हणजे पैसे घेणाऱ्यांमध्ये एका महिला पोलिस कर्मचारीही होती.  हेडकाँस्टेबल रमेश सूरनार, पोलीस काँस्टेबल निखिल पवार, प्रवीण शिंपाळे व प्रियंका आखाडे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

सोलापूर जिल्ह्यात राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर २८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून तेथे वाहनांची कागदपत्रे तपासून सोडली जातात. सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा तसेच परराज्यातील वाहनचालकांकडून भीमानगर नाकाबंदी पॉईटवर पैसे घेऊन सोडले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षकांना त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांनी पैसे घेणार्‍या चार पोलिसांना निलंबित केले.

ही बातमी वाचा : पंढरपुरात कोविड केअर सेंटरमध्येही पैसे मोजावे लागणार 

विधानसभेच्या पोट निवडणुकीनंतर कोरोनाचा मोठा फैलाव पंढरपूर भागात झाल्याने सारे हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर फुल झाल्याने आहेत. अशातच आता  कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या लोकांकडून  रोज 700 रुपये घेवून  केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. हा अजब पेड कोविड सेंटरचा  प्रयोग विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवासमध्ये सुरू करण्यात आला आहे.
सौम्य लक्षण असणार्या रूग्णांवर आता मोफत उपचार आणि जेवण दिले जात होते. मात्र आता याच विलगीकरणासाठी लोकांना चक्क पैसे मोजावे लागणार आहेत.

ही बातमी वाचा : राजकारणात प्रवेश करण्याविषयी नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड काय म्हणाले?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख