ग्रामपंचायत निवडणुकीत पती-पत्नी आमने-सामने : पत्नीचा दारुण पराभव

नातेवाईक एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची उदाहरणेअसली तरी पती-पत्नीचा हा सामना पहिलाच होता...
Naygaon Election
Naygaon Election

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीत पती विरूध्द पत्नीच्या  लढत झाली, यात प्रभाग क्रमांक पाचमध्ये पती नरेंद्र पाटील विजयी झाले तर पत्नी मिनाक्षी नरेंद्र पाटील पाटील पराभूत झाल्या. दोघेही माजी सरपंच आहेत.

नायगाव ग्रामपंचायतीत तेरा सदस्य आहेत. यात माजी सरपंच नरेंद्र रंगराव पाटील यांचे पॅनल उभे होते. प्रभाग पाचमध्ये त्यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सौ. मिनाक्षी नरेंद्र पाटील यांच्या विरोधात त्याची लढत होती. मिनाक्षी पाटील या सुध्दा माजी सरपंच आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष होते. यात पती नरेंद्र पाटील हे विजयी झाले त्यांना २८१ मते मिळाली तर त्यांच्या पत्नी सौ.मिनाश्री पाटील यांना १४ मते मिळाली. या निवडणूकीत नरेंद्र पाटील यांचे पॅनेल विजयी झाले आहे.

सौ. मिनाक्षी पाटील यांनी तीन प्रभागात उमेदवारी केली होती. त्या माजी सरपंच  आहेत.  तीनही ठिकाणी त्या पराभूत झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये त्यांना १२६ मते मिळाली तर प्रभाग क्रमांक २ मध्ये त्यांना ६६ मते मिळाली. सौ. मिनाक्षी पाटील या उच्चशिक्षीत आहेत, त्यांचे सामाजिक  कार्य करीत असतात. नायगाव ग्रामपंयातीत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनलचा विजय झाला असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केला आहे.

जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या बंधूचे पॅनल पराभूत,महाविकास विजयी
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मनुर बुद्रूक गावात त्याचे बंधू पंजाबराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. पाटील यांचे पुतणे सागर पंजाबराव पाटील यांचाही हार झाली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील  यांचे बोदवड तालुक्यात मनुर बुद्रूक हे मूळगाव आहे. त्यांचे बंधू पंजाबराव पाटील यांची ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. यावेळी त्यांच्यातर्फे पॅनल उभे करण्यात आले होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाराज गटाने महाविकास आघाडी पॅनल उभे केले होते. निवडणूकीत पॅनॅल प्रमुख पंजाबराव पाटील  यांचे चिरंजीव व रवींद्र पाटील यांचे पुतणे सम्राट पंजाबराव पाटील उभे होते. त्यांचा महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेवारां सागर प्रभाकर पाटील यांनी पराभव केला.

राष्ट्रवादीचे पॅनल पराभूत

मनुर बुद्रूक ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य आहेत. त्या पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पंजाबराव पाटील यांच्या पॅनलचे केवळ एक सदस्य निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे तब्बल दहा सदस्य निवडून  आले आहे. यामुळे  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांना हा धक्का मानला जात आहे, 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com