सुमित्रा महाजन यांची तब्येत उत्तम : थरूर यांच्या चुकीच्या ट्विटमुळे पसरली होती अफवा

विनाकारण पसरली तब्येतीविषयी अफवा
sumitra mahajan
sumitra mahajan

इंदूर : माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते शशी थरूर हे आज भलत्याच संकटात सापडले. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचे ट्विट करून त्यांनी खळबळ उडवून दिली. मात्र महाजन यांची प्रकृती स्वस्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाजन यांनी आपला 78 वा वाढदिवस नुकताच 12 एप्रिल रोजी साजरा केला. त्यांना ताप आल्याने इंदूरमधील बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या इतर चाचण्यांचे अहवालही उत्तम असल्याने त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

थरूर यांनीच सर्वात आधी महाजन यांच्याविषी ट्विट केले. कोणत्याही न्यूज चॅनेलकडे किंवा वृत्तसंस्थांकडे ही बातमी नव्हती. महाजन यांची तब्येत उत्तम असल्याचे समजल्यानंतर थरूर यांनी आपले ट्विट डिलीट केले.  आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली असल्याने ती खरी असल्याचे समजून ते ट्विट केल्याचा खुलासा थरूर यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये केले. इंदूरचे आमदार रमेश मेंडोला यांनीही थरूर यांची माहिती चुकीची असल्याचे सांगत त्यांना सद्बुद्धी मिळो, अशी कामना केली. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनीही ताई एकदम स्वस्थ असल्याचा निर्वाळा दिला आणि देव त्यांना भरपूर आयुष्य देवो, अशा शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com