डीवायएसपी मुलगी समोर आली अन् पीआय पित्याने ठोकला कडक सॅल्यूट! - in andhra pradesh photo of father on duty saluting dysp daughter goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

डीवायएसपी मुलगी समोर आली अन् पीआय पित्याने ठोकला कडक सॅल्यूट!

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जानेवारी 2021

हैदराबाद पोलीस दलाचा कर्तव्य मेळावा तिरुपती येथे सुरू आहे. या कर्तव्य मेळाव्यात पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांनी केलेल्या सॅल्यूटची मोठी चर्चा सुरू आहे. 

हैदराबाद : हैदराबाद पोलीस दलातील पोलीस उपअक्षीधक (डीवायएसपी)  जेस्सी प्रशांती नेहमीप्रमाणे त्यांचे कर्तव्य पार पाडत होत्या. या वेळी पोलीस निरीक्षक (पीआय) श्याम सुंदर हे समोर आले. सुंदर यांनी वरिष्ठ अधिकारी असलेल्या जेसी यांना कडक सॅल्यूट ठोकला. या वेळी सुंदर यांच्या चेहऱ्यावरुन अभिमान ओसंडून वाहत होता तर जेस्सी यांचा आनंद गगनात मावत नव्हता. यामागे कारण होते की, सुंदर हे जेस्सी यांचे पिता आहेत. 

हैदराबाद पोलिसांचा कर्तव्य मेळावा तिरुपती येथे सुरू आहे. या मेळाव्यात अगदी चित्रपटाला साजेशी ही घटना घडली. यावेळचा सुंदर आणि जेस्सी यांच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांच्या ट्विटर हँडलवरूनही हा अनोखा फोटो शेअर करण्यात आला आहे. अनेक जण जेस्सी आणि सुंदर यांचे तोंडभरून कौतुक करीत आहेत. 

जेस्सी या 2018 च्या बॅचच्या अधिकारी आहेत आणि त्यांची नियुक्ती गुंटूर जिल्ह्यात आहे. आंध्र प्रदेश पोलीस दलाचा कर्तव्य मेळाव्यासाठी त्या तिरुपती येथे गेल्या होत्या. तिथे त्यांची वडिलांशी भेट घडली. चित्रपटात पहिल्या दिवशी कामावर जाणाऱ्या मुलीबद्दल पित्याला वाटतो तसा अभिमान सुंदर यांना त्या दिवशी वाटला. जेस्सी या पोलील दलात रूजू झाल्यानंतर कर्तव्यावर असताना पहिल्यांदाच त्यांचे वडील समोर आले होते. 

याबद्दल डीवायएसपी जेस्सी म्हणाल्या की, माझे वडील नेहमीच मला प्रोत्साहन देत राहिले. त्यांच्या पाठबळामुळेच मी पोलीस दलात आले. मला पोलीस दलात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा वडील समोर आले त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ झाले. माझ्या वडिलांना पोलीस दलात सेवा करताना अनेक जणांना मदत केलेली मी लहानपणापासून पाहत आहे. तेच माझी पोलीस दलात येण्याची प्रेरणा आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख