भोसरी विधानसभा : आमदार महेशदादांचं पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट

पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर विरोधकांनी वैयक्तिक टीका केली असतानाही त्यांनी प्रचार संपेपर्यंत आपल्या ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ या तत्वाशी तडजोड केली नाही. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आजच्या सांगता सभेतही शुक्रवारी रात्री त्यांनी टीकेला प्रत्यूत्तर देण्याऐवजी विकासकामांचा अजेंडाच भाषणात सांगितला.
भोसरी विधानसभा : आमदार महेशदादांचं पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर विरोधकांनी वैयक्तिक टीका केली असतानाही त्यांनी प्रचार संपेपर्यंत आपल्या ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ या तत्वाशी तडजोड केली नाही. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आजच्या सांगता सभेतही शुक्रवारी रात्री त्यांनी टीकेला प्रत्यूत्तर देण्याऐवजी विकासकामांचा अजेंडाच भाषणात सांगितला.

भर पावसात झालेल्या या अखेरच्या विजयी संकल्प सभेत महेशदादांनी विरोधकांची १५ वर्षे सत्ता आणि आपली ५ वर्षे सत्ता अशी तुलनात्मक मांडणी करीत भोसरीकरांची मने जिंकली. ही सभा झालेल्या ठिकाणीच एक दिवस अगोदर महेशदादांवर वैयक्तिक पातळीवर टीका झाली होती. त्यामुळे ते सुद्धा पलटवार करतील, अशी शक्यता होती. अत्यंत आक्रमक कार्यकर्त्यांचा नेता अशी महेशदादांची ओळख आहे. त्यांचे शेकडो युवक कार्यकर्ते कोणत्याही क्षणी संतप्त होवू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: संयम ठेवून निवडणुकीच्या अखेरच्या दोन दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेतल्याचे दिसले.

विरोधकांनी केलेल्या आरोपांवर चर्चा न करता त्यांनी मुद्देसूद भाषण केले. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, कचरा समस्या हे प्रश्न कोण सत्तेत असताना निर्माण झाले? ते प्रलंबित कुणामुळे राहिले? गेल्या पाच वर्षांत त्यांची सोडवणूक करण्यासाठी कसा पाठपुरावा केला? याबाबत लेखाजोखा मांडला. भोसरीच्या विकासाबाबत आगामी २० वर्षांचा विचार करुन केलेले नियोजन आणि हाती घेतलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प याबाबत उपस्थित नागरिकांना आश्वासीत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com