OMG....'महेश झगडे एक्‍सप्रेस' 2018 मध्ये धावली 1731 किलोमीटर!  - Mahesh Zagde's Passion for Running | Politics Marathi News - Sarkarnama

OMG....'महेश झगडे एक्‍सप्रेस' 2018 मध्ये धावली 1731 किलोमीटर! 

संपत देवगिरे
रविवार, 20 जानेवारी 2019

आपल्या नियमीत व काटेकोर व्यायामासाठी प्रसिध्द असलेले सनदी अधिकारी झगडे निवृत्त झाल्यावर त्यावर ठाम आहेत. त्यातुनच ते आनंदी आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी नियमीत चालण्याचे 'मॉनीटरींग' केले आहे. त्याचा चार्ट त्यांनी काही मोजक्‍या सहकारी व मित्रांसोबत शेअर केला.

नाशिक : 'फिटनेस' विषयी प्रचंड जागरुक असलेले सनदी अधिकारी महेश झगडे निवृत्तीनंतरही तेव्हढ्याच उत्साहाने व्यस्त आहेत. गतवर्षी 2018 मध्ये ते तब्बल 1731 किलोमीटर धावले. यातुन त्यांनी अकरा किलो मेद जाळला. हे अंतर कोल्हापुर ते नवी दिल्ली एव्हढे आहे. त्यामुळे सामान्यतः निवृत्तीनंतर आरामदायी शैलीवर जे भर देतात. त्यांच्यासाठी महेश झगडे यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

आपल्या नियमीत व काटेकोर व्यायामासाठी प्रसिध्द असलेले सनदी अधिकारी झगडे निवृत्त झाल्यावर त्यावर ठाम आहेत. त्यातुनच ते आनंदी आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी नियमीत चालण्याचे 'मॉनीटरींग' केले आहे. त्याचा चार्ट त्यांनी काही मोजक्‍या सहकारी व मित्रांसोबत शेअर केला. त्यात ही विस्मयजनक माहिती पुढे आली. 2018 मध्ये 1731 किलोमीटर धावले. हे हवाई अंतर नवी दिल्ली ते बंगलुरु किंवा रस्त्याने होणारे अंतर कोल्हापूर ते नवी दिल्ली एवढे होते. याशिवाय ते चौदा किलोमीटर उंचीपर्यंत चढाई केली. ही उंची व्यवसायिक विमानाच्या उड्डानाच्या दीडपट होते. याचा लाभ म्हणजे त्यांनी अकरा किलो मेद घटवला अथवा जाळला असे म्हणता येईल. 

मंत्रालयात कार्यरत असतांना त्यांचे कार्यालय 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' मध्ये तिसाव्या मजल्यावर होते. कार्यालयात जातांना ते लिफ्ट टाळून तीस मजले जिन्याने चढून जात असत. गेली अनेक वर्षे त्यांची दिनचर्या म्हणजे, सकाळी सहाला उठणे. एक ते दीड तास हलका व्यायाम. सकाळी नऊ ते दहा या वेळेत हलका नाश्‍ता व दुपारचे जेवण एकाच वेळी घेणे. कार्यालयात जाणे. सायंकाळी पाचच्या दरम्यान रात्रीचे जेवण. त्यानंतर सायंकाळी सातला जॉगींग करताना सहा मैल धावणे. 

पुण्यात असतांना ते अनेकदा चालकासह गाडी सोडून स्वतः चालत घाट चढुन जात असत. त्यांनी आपल्या व्यायामाला त्यांनी ट्रेकींगची जोड दिलेली आहे. त्यामुळे अद्यापही ते नियमीतपणे ट्रेकींगला जातात. त्याचा परिणाम म्हणून त्यांचे वजन 62 ते 64 किलो यापेक्षा कमी किंवा जास्त कधी होत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या या व्यायामाचा त्यांना आनंदी व कार्यक्षम राहण्यात प्रचंड फायदा झाला आहे. साठीनंतरही त्यांचा किमान रक्तदाब 70 ते 80 तर कमाल 110 ते 120 असा आठवी नववीच्या विद्यार्थ्याएव्हढा उत्तम राहिला आहे. आनंदी जीवनाचे अन्‌ ध्येयाधीष्टीत जीवनासाठीची ही दिनचर्या सोपी नाही. तेव्हढीच काटेकोर आहे. त्यामुळे सतत धावणाऱ्या झगडेंना 'महेश झगडे एक्‍सप्रेस' असे संबोधले तर वावगे ठरणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख