पूरग्रस्तांना गायी म्हशी द्या , महेशदादांचे  दहीहंडी व गणेश मंडळांना आवाहन  

बैलगाडा शर्यतीच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पेटा या प्राणीप्रेमी एनजीओनेही या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे . -महेशदादा लांडगे
Mahesh_Landge
Mahesh_Landge

पिंपरीः भीषण पूरामुळे सांगली, कोल्हापूर परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या शेतातले पीक आणि गोठ्यातले पशुधन त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह इतर मदत त्यांना मिळाली आहे.मात्र,खरी गरज व आवश्यकता ही पशुधनाची असल्याने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गोशाळा आणि दहीहंडी उत्सव मंडळांनी त्यांना गायी , म्हशी आणि बैलजोड्या  उपलब्ध करुन द्याव्यात  , असे आवाहन पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

आधी केले,मग सांगितले या उक्तीनुसार वरील आवाहनाची सुरवात महेशदादांनी स्वता:पासून केली आहे. गौरी आणि गणपतीच्या सणानिमित्त त्यांच्या होम मिनिस्टर पूजा अध्यक्ष असलेल्या शिवांजली सखी मंचच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघात ६५ कार्यक्रम नियोजित केले होते. मात्र, राज्यातील पूरपरिस्थितीमुळे ते त्यांनी रद्द केले आहेत. त्यातून बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली जाणार आहे. 

तसेच मतदारसंघातील सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव मंडळे प्राधान्याने हा पशुधनाचा उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध उलगडताना ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये मी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. . सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकरी पशुधन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळातात हे मला माहीत आहे. अनेक शेतक-यांनी गुरांना कुठे सोडयचे म्हणून घर आणि गोठा सोडला नाही. पशुधन या शेतक-यांना जीवनाचा भाग आहे. माझ्या घरीसुद्धा पशुधन आहे.तसेच माझ्या मतदारसंघातही ग्रामीण भागात अजूनही पशुपालन केले जाते. 

महेशदादा जीवनाश्यक वस्तूंचे ४० टेम्पो भरून बचावपथकासह पूरग्रस्त भागात सांगली व कोल्हापूरमध्ये सध्या आहेत. ते व त्यांचे समर्थक नगरसेवक, कार्यकर्त्यांनी सुमारे १५ हजार पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोच केली आहे. या मदतकार्यात त्यांना काही बाबी निदर्शनास आल्या. फक्त सांगली जिल्ह्यातच सुमारे दहा हजारांच्या पुढे पशुधन गमावले आहे,अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी त्यांना दिली. कोल्हापूर जिल्ह्यात तर हा आकडा आणखी मोठा आहे. 

शेतीला जोड व्यावसाय म्हणून पशुपालन केले जाते.पुरामुळे शेतकऱ्यांचे आगामी तीन वर्षांत भरून येणार नाही इतके नुकसान झाले आहे. त्यातही त्यांना पशुधनाची तातडीने गरज आहे. ते मिळवून दिले, तर आगामी पाच- सहा महिने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने त्यासाठी मदतीची हाक दिल्याचे महेशदादांनी सांगितले.कारण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पूरक व्यवसाय असलेला पशुपालन हा त्यांचा कणाच या महापूरात मोडून पडला आहे,असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

 म्हणून राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांनी विद्युत रोषणाई, गणपती आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, खर्चिक देखावे, विविध कार्यक्रम यावर होणारा मोठा खर्च या वर्षी कमी करून प्रत्येक मंडळाने किमान एका पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत म्हणून पशुधन भेट द्यावे,असे आवाहन  त्यांनी केले आहे. तसेच गोशाळा व्यवस्थापनांनीही आपापल्या परीने पूरग्रस्त शेतक-यांना पशुधन दान करावे, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. बैलगाडा शर्यतीच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पेटा या प्राणीप्रेमी एनजीओनेही या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे,अशी कोपरखळी मारण्यास ते विसरले नाहीत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com