लक्षवेधी भाऊंची, पाठिंबा दादांचा

Mahesh Landge to Support Point of Order Motion by Laxman Jagtap in Assembly
Mahesh Landge to Support Point of Order Motion by Laxman Jagtap in Assembly

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पाणीप्रश्न नागपूरात पोचला आहे. दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरवासियांत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शहराला अधिकचा पाणीपुरवठा करणाऱ्या प्रलंबित योजना तातडीने मार्गी लावा,अशी मागणी करणारी लक्षवेधी शहराचे कारभारी आणि भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधीमंडळाच्या नागूपर येथील हिवाळी अधिवेशनात दिली आहे. त्याजोडीने शहराला भेडसावणाऱ्या गंभीर व ज्वलंत अशा शास्तीकरप्रश्नी दुसरी लक्षवेधी असून हा कर सरसकट पूर्ण माफ करण्याची मागणी केली गेली आहे. या दोन्ही लक्षवेधींना शहरातील भाजपचे दुसरे आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनी पाठिंबा दिला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरूनही शहरात २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. परिणामी शहरवासियांचा प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्याविरोधात पालिकेतील सत्ताधारी भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी नुकतेच आंदोलन केले आहे. तर, भाजपच्या काही व त्यातही महिला नगरसेवकांनी दिवसाआड पाणी बंद करण्याची मागणी करून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.

समान पाणीपुरवठ्यासाठी हे पाऊल उचलल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लागत नसल्याने वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात पाणी देता येत नाही. तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजनही होत नसल्याचे पाणीकपात करावी लागल्याची कबुली आमदार भाऊ व दादांनी  दिली आहे. मात्र, पुरेसे आणि योग्य दाबाने पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या प्रलंबित योजना (भामा आसखेड व आंद्रा धरण यातून पाणी आणणे) तातडीने मार्गी लावाव्यात, त्याकरिता निधी द्यावा, अशी मागणी या दोन्ही आमदारांनी लक्षवेधीव्दारे केली आहे.

शासनाप्रती नाराजी व नागरिकांत असंतोषाची भावना असलेला दुसरा शास्तीकराचा प्रश्नही पूर्णपणे मार्गी लागण्यासाठीची दुसरी लक्षवेधी आहे. गट टर्मला हा प्रश्न शहरातील तिन्ही आमदारांच्या पाठपुराव्यामुळे काहीअंशी मार्गी लागला. त्याव्दारे फक्त एक हजार चौरस फूटांपर्यंत निवासी बांधकाम असलेल्यांना या जिझीया करातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यापुढील क्षेत्रफळ असलेले असे निवासी आणि सर्व व्यापारी बांधकामधारकांत असंतोष आहे. तसेच सवलतीच्या आदेशात सुसूत्रता सुस्पष्टता नसल्याने त्याच्या लाभापासून बहूतांशजण वंचितच राहिले आहेत. परिणामी सरसकट पूर्ण शास्तीमाफी देण्यात यावी,अशी मागणी जगताप व लांडगेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com