Mahesh Landge mla birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : महेश लांडगे -  आमदार - भोसरी (भाजप) 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजपचे तरुण, तडफदार आमदार आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे.  ते पैलवान आहेत. गतवेळी मोदी लाटेत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. गेल्या महिन्यात ते 77 हजार एवढ्या  मतांनी पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली, हा मोठा योगायोग आहे. 

2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.  ते पदवीधर असून व्यायाम,
क्रीडा, संगीत आणि चित्रपट हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दूल कलाम हे त्यांचे आदर्श आहेत. कुस्तीबरोबर कबड्डीतही त्यांनी शालेय स्तरापासून नेतृत्व केले आहे. वडिलांप्रमाणे कुस्तीतच त्यांना करिअर करायचे होते. मात्र, सामाजिक कामाच्या आवडीतून ते राजकारणात आले. 

एनएसयूआयचे शहराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 2004 ला ते राष्ट्रवादीचे नगरसेवक झाले. नंतर त्यांनी या पदाची हॅटट्रिक केली. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी भोसरी व्हीजन 2020 हा उपक्रम राबवला होता.  नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी हेल्पलाइन सुरू केलेली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख