महेशदादांची बजरंगाची मूर्ती तर लक्ष्मणभाऊंची गदा......

निवडून आल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगेंनंतर चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी दादा, भाऊंच्या रुपाने पिंपरी-चिंचवडचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघण्याची दाट शक्यता असल्याने या दोन भेटी खूप महत्वाच्या ठरणार आहेत.
Laxman Jagtap - Mahesh Landge Meets Devendra Fadanavis
Laxman Jagtap - Mahesh Landge Meets Devendra Fadanavis

पिंपरी : निवडून आल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगेंनंतर चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी दादा, भाऊंच्या रुपाने पिंपरी-चिंचवडचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघण्याची दाट शक्यता असल्याने या दोन भेटी खूप महत्वाच्या ठरणार आहेत.

जगतापांनी मुख्यमंत्र्यांना बजगरंगाची गदा भेट दिली. तर, दोन दिवसांपूर्वी (ता.२६) पैलवान महेश लांडगेंनी बजरंगाची मुर्तीच भेट दिली होती. हनुमान मुर्ती भेट दिल्याने त्या भेटीची मोठी चर्चा झाली होती. तर, आज जगतापांनीही दिलेल्या गदेच्या भेटीची तशीच चर्चा झाली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्या दिल्या. तसेच राज्यात पुन्हा भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. त्यावर आमदारकीची हॅटट्रिक केल्याबद्दल जगतापांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

यावेळी जगतापांबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, स्वीकृत नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, शहर प्रवक्ते अमोल थोरात होते. शुभेच्छानंतर मुख्यमंत्र्यांनी भाऊंना बाजूला घेत दोन मिनिट गुफ्तगू केले. त्यात उद्योगनगरीला मंत्रीपद देण्याबाबत चर्चा झाली की कसे ते, मात्र लगेच समजू शकले नाही. यावेळी वर्षावर मिठाई देऊन जगताप व सहकाऱ्यांचे तोंड गोड कऱण्यात आले.

२४ तारखेला विधानसभेचा निकाल लागला. राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सर्वाधिक १०५ आमदार भाजपचे निवडून आले. त्याबद्दल २६ तारखेला लांडगेंनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी त्यांनी बजरंगबलीची मुर्ती मुख्यमंत्र्यांना भेट दिली होती. दादा, भाऊंप्रमाणे भाजपचे इतरही आमदार वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहेत. मात्र,दादा, भाऊंच्या आगळ्या भेटवस्तूमुळे त्यांची भेट चर्चेची आणि वेगळी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com