महेश लांडगे देणार पूरग्रस्त मुलांना दोन लाख वह्यापेन

शनिवारी (दि. 24) होणा-या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री जेनेलिया देशमुख, मराठी चित्रपट श्रृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे, अपुर्वा निमळेकर, धनश्री काडगावकर या ठरणार आहेत.
Mahesh_Landge to help students
Mahesh_Landge to help students

पिंपरीः यंदा केवळ दहीहंडी सन साजरा न करता कबड्डी संघाने यानिमित्त पुरग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना 2 लाख वह्या आणि पेन वाटप करण्याचा संकल्प भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

पूरग्रस्त कोल्हापूर व सातारा भागाला जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय मदत दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखून त्यांच्या मुलांना आता दोन लाख वह्या,पेन देणार आहेत. उद्याच्या दहीहंडी उत्सवातून ते ही मदत गोळा करणार आहेत.  

महेश लांडगेंकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. त्यामार्फत त्यांनी पूरग्र्स्तांना हवी ती नेमकी मदत गोळाच केली नाही,तर ती अगदी व्यवस्थित पोचही केली.त्यासाठी त्यांनी मोठे नुकसान झालेल्या १७ गावांवर लक्ष्य केंद्रित केले. तेथे तीसहून अधिक ट्रक सामान, वैद्यकीय पथक त्यांनी आपल्या भैरवनाथ कबड्डी संघाच्या कार्यकर्त्यांसह पाठवले. कुटुंबाची गुजराण असलेले पशूधन (गाई,म्हशी) या महापूरात गेलेल्या ५३ गरजूंना ते आता दुभत्या गाई देणार आहेत. 

एवढेच नाही,तर महिनाभर पुरेल एवढे  पशुखाद्य,दुधासाठी बादली, गाई बांधण्यासाठी दावेसुद्धा देण्याची खबरदारी ते घेणार आहेत.  अन्नधान्यासह इतर जीवनाश्यक वस्तूंची मदत भरपूर झाल्याने आता पूरग्रस्त भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. तेथे सरकारने पुस्तके दिली आहेत.मात्र, वह्या,पेन नसल्याने शाळा व विद्यार्थ्यांची अडचण होत होती.ती  मदत येथून देण्याचे ठरविले असल्याचे महेशदादांनी सांगितले.

 त्यासाठी त्यांच्या भैरवनाथ कबड्डी संघाच्याच दहा हजार सदस्यांना प्रत्येकी  दहा वह्या पेन आणण्यास उद्याच्या दहीहंडी उत्सवानिमित्त आणण्यास सांगितले आहे. भोसरीतील पीएमटी चौकात भैरवनाथ कबड्डी संघाच्या वतीने दहीहंडी साजरी केली जाते. 

यंदा शनिवारी (दि. 24) होणा-या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री जेनेलिया देशमुख, मराठी चित्रपट श्रृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे, अपुर्वा निमळेकर, धनश्री काडगावकर या ठरणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com