आजचा वाढदिवस : आमदार महेश लांडगे, भोसरी - mahesh landage mla in bhosari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आमदार महेश लांडगे, भोसरी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे निवडून आले आहेत. या निवडणुकीत ते प्रथम अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. आता ते भाजपचे सहयोगी आमदार झाले आहेत. आमदार होण्यापूर्वी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून येत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. पिंपरी पालिकेत 15 वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अजित पवार यांच्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात दादा म्हणून ते ओळखले जातात. ते पैलवान आहेत. तरुण,तडफदार आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे निवडून आले आहेत. या निवडणुकीत ते प्रथम अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. आता ते भाजपचे सहयोगी आमदार झाले आहेत. आमदार होण्यापूर्वी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून येत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. पिंपरी पालिकेत 15 वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अजित पवार यांच्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात दादा म्हणून ते ओळखले जातात. ते पैलवान आहेत. तरुण,तडफदार आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे तरुण कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख