मंत्री महादेव जानकर स्वतः स्ट्रेचर ढकलतात तेव्हा.

मंत्री महादेव जानकर स्वतः स्ट्रेचर ढकलतात तेव्हा.

   इंदापूर ( जि.पुणे ) : अपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऎवजी बघ्याची भूमिका घेणारे जास्त असतात. आपल्या समोरच घडलेल्या अपघातातील जखमींना राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत टाकून दवाखान्यात पोहोच तर केलेच

दवाखान्यासमोर उभ्या असलेल्या रूग्णवाहिकेचा दरवाजा उघडून त्यातील स्ट्रेचर जानकर यांनी बाहेर काढले. पोलिसांच्या मदतीने जखमीना स्ट्रेचरवर टाकून स्ट्रेचर स्वतः जानकर यांनी दवाखान्यात ढकलत नेले. त्यामुळे दोन जणांचे प्राण वाचल्याची घटना पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ घडली. 

  काल रविवारी सायंकाळी मंत्री जानकर हे पंढरपूरकडे जात असताना पळसदेवनजीक त्यांच्यासमोर एक मोटार ट्रकला धडकली. मोटार ट्रकखाली घुसल्याने अपघात गंभीर होता. अपघातात दोन जण मोटरीत अडकले.

जानकर यांनी तात्काळ गाडी थांबवली. अपघात घडताच बघ्यांची गर्दी जमली. मात्र त्यातील मदतीला कोणी पुढे येईना. जानकर यांनी ताफ्यातील पोलिसांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढले. पोलिसांच्या गाडीत घालून त्यांना 

इंदापूर येथील डॅा. सचिन बिचकुल यांच्या रूग्णलयात नेले. तेथे गेले तर डॅा. बिचकुले शस्त्रक्रियेमुळे ऑपरेशन थिएटरमध्ये होते. रूग्णवाहिकेतील स्ट्रेचर बाहेर काढून त्यावर जखमींना ठेऊन जानकर यांनी स्वतः स्ट्रेचर ढकलला. व्यस्त दिनक्रम असूनही प्रसंगावधान राखून मंत्री जानकर जखमींच्या मदतीला धावून आले. जखमींनी जानकर यांचे आभार मानले.   

अपघातात जखमी झालेले रेणू शुक्ला व रविन शुक्ला ( रा. मुंबई ) यांच्यावर डॅा. बिचकुले व त्यांच्या सहकार्यांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविले. घटनेच्या ठिकाणी बघ्यांची भूमिका घेणा-यांना जानकर यांनी खडे बोल सुनवले. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com