शिवतारेंच्या लढतीला महायुतीची साथ : बाबाराजे, कामठे, कुंजीरही जोडीला

शिवतारेंच्या लढतीला महायुतीची साथ : बाबाराजे, कामठे, कुंजीरही जोडीला

सासवड : गुंजवणी धरण पूर्ण करुन त्याचे पाणी पुरंदरसह तीन तालु्क्यात आणण्यासाठी आजपर्यंत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी एकाकी लढत दिली. आजारपणाशी झुंजत गुंजवणीचं काम मार्गी लावलं. न्यायालयातही कॉंग्रेसच्या वाईट प्रवृत्तींना हरवलं. आता जनतेच्या न्यायालयात कॉंग्रेस व आघाडीला धुळ चारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महायुती भक्कमपणे मैदानात उतरली असून शिवतारेंच्या विजयासाठी आम्ही जीवाचं रान करु, असे प्रतिपादन महायुतीच्या संयुक्त पत्रकार परीषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले. 

पुण्यात भाजपचे जेष्ठ नेते व खासदार गिरीश बापट, बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे तसेच शिवसेना - भाजप व मित्रपक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची काल रात्री बैठक झाली. त्यानुसार महायुतीचे उमेदवार शिवतारेंसाठी ताकत लावण्याचा निर्धार झाला. त्यातून आज पत्रकार परीषदेत महायुती एकवटल्याचे दिसून आले.

यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, सभापती रमेश जाधव, भाजप हवेली तालुकाध्यक्ष पंडितदादा मोडक, पुरंदर तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव, शिवसेना नेते शंकरराव हरपळे, गिरीश जगताप, कुंडलीक जगताप, राजेंद्र जगताप, धनंजय कामठे, राहुल शेवाळे, संजय निगडे, नितीन जांभळे, निलेश जगताप, कैलास ढोरे, आरपीआयचे विष्णू भोसले, पंकज धिवार, नेटके, साकेत जगताप, बाळासाहेब भोसले, विनोद धुमाळ, पांडुरंग रोडे, संतोष हरपळे, कैलास जगताप, जालिंदर जगताप, गणपत दगडे, संदिप बेलदरे, संदिप हरपळे, संदिप नवले यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्वीची काँगेस राहीली नाही, असे म्हणत माजी आमदार कुंजीर यांनी पाठींबा जाहीर केला. यावेळी आरपीआयचे भोसले म्हणाले., राज्यमंत्री शिवतारे यांनी गुंजवणीच्या पाण्यासाठी स्वतःचं शरीर पणाला लावलं. आता त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. तालुक्याच्या प्रगतीसाठी तालुक्यातून सत्तेतला आमदार निवडून जाणे आवश्यक आहे. राज्यात भाजप शिवसेना व मित्रपक्षांची सत्ता येणार हे निश्चित असल्यामुळे शिवतारेंसाठी सर्वांनी झोकून देऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

मी विकासाच्या वाटेवरून ढळणार नाही ः शिवतारे

तालुक्याच्या जनमनावर तीन दशकं दादा जाधवराव यांनी राज्य केलं आहे. कॉंग्रेसच्या वाईट प्रवृत्तीला त्यांनी सत्तेपासून दूर ठेवत सर्वसामान्यांना आधार द्यायचं काम केलं. मागील दशकभर तेच काम मी करत आलोय. यापुढेही तेच करणार. माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका झाली, तरी मी तालुक्याला विकासाच्या वाटेवरून ढळणार नाही. पण गुंजवणीतील अडथळ्याचे पापही मांडत राहणार, असे बोलत शिवतारे यांनी संजय जगताप व सिल्व्हर ज्युबिली कंपनीची कागदपत्रे वाचून सादर केली.  

माजी आमदार संभाजी कुंजीरांचा शिवतारेंना पाठींबा

पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी शिवतारे यांना जाहीर पाठींबा दिला. गांधीजींची कॉंग्रेस आता राहिलेली नाही. पुरंदर तालुक्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वाने चुकीची संस्कृती रुजवली. गुंजवणीत खोडा घालण्याचा त्यांचा डाव न्यायालयानेही उधळून लावला आहे. आता पाणी येणार हे निश्चित असून वाईट प्रवृत्तींना दुर ठेवण्यासाठी मी शिवतारे यांना जाहीर पाठींबा देत आहे, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com