जळगाव जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेच्या हालचाली

जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची मुदत संपली आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. लवकरच या पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे सत्तेचे समीकरण जुळले आहे. जिल्हा परिषदेतही हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते
Ravindra Patil NCP and Sandeep Patil Congress Planning To Capture Jalgaon Zilla Parishad
Ravindra Patil NCP and Sandeep Patil Congress Planning To Capture Jalgaon Zilla Parishad

जळगाव  : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. जळगाव जिल्हा परिषदेतही आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सद्यःस्थितीत सत्तेत भाजपसोबत कॉंग्रेस आहे. मात्र आता कॉंग्रेसने ,राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेसोबत येण्याबाबत भूमिका जाहीर करावी, असे 'राष्ट्रवादी'तर्फे कॉंग्रेसला कळविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची मुदत संपली आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. लवकरच या पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे सत्तेचे समीकरण जुळले आहे. जिल्हा परिषदेतही हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. त्यामुळे आता तिन्ही पक्षांतर्फे सत्तेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची चर्चा झाली. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेच्या महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. सध्या कॉंग्रेसचा भाजपला पाठिंबा आहे; परंतु त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेसोबत येण्याबाबत काय भूमिका आहे, हे जाहीर करावे, असे आपण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांना कळविले आहे.याबाबत त्यानी सकारात्मकता दर्शविली आहे. सद्यःस्थितीत ते मुंबई येथे आहेत. तेथून परतल्यानंतर त्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता निश्‍चित येईल, असा विश्‍वासही अॅड. रविंद्र पाटील पाटील यांनी व्यक्त केला.

पक्षीय बलाबल
(बहुमतासाठी 34 आवश्‍यक)
भाजप-33
कॉंग्रेस-04
शिवसेना-14
राष्ट्रवादी-16

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com