आशिया खंडातील सर्वात मोठी मुंबई बाजार समिती महाविकास आघाडीकडे; भाजपला भोपळा

राज्यातील सहकारी बाजार समितीची अग्रणी संस्था मानली जाणारी मुंबई बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे. काल जाहीर झालेल्या निकालात भाजपला भोपळाही फोडता आला नाही
MahaVikasAghadi Captured Mumbai Market Committee
MahaVikasAghadi Captured Mumbai Market Committee

नाशिक  : राज्यातील सहकारी बाजार समितीची अग्रणी संस्था मानली जाणारी मुंबई बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे. काल जाहीर झालेल्या निकालात भाजपला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भाजपने सहकार क्षेत्रात केलेल्या प्रवेशाला उतरती कळा लागणार, असे बोलले जाते आहे.

शनिवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल वाशी येथे झाली. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे १२ संचालक निवडून आले. पाच जागांवर अपक्ष सदस्य निवडून आले. विजयी झालेले उमेदवार असे

पुणे : बाळासाहेब हणमंतराव सोळस्कर (४६३), धनंजय कृष्णा वाडकर (३९०), नाशिक : जयदत्त सीताराम होळकर (४०२), नागपूर : सुधीर दौलतचंद कोठारी (४९२), हुकूमचंद गोविंदराव आमधरे (३८७), औरंगाबाद : अशोक गोविंदराव डक (६३५), वैजनाथ ग्यानदेव शिंदे (४६९), अमरावती : प्रविण विनायकराव देशमुख (४८८), माधवराव गणपतराव जाधव (४३७), कोकण : राजेंद्र महादेव पाटील (१२४), 

कांदा बटाटा व्यापारी गट : अशोक देवराम वाळुंज (४३१), माथाडी कामगार गट : शशिकांत शिंदे , फळ व्यापारी गट : संजय पानसरे (बिनविरोध)) हे महाविकास आघाडी चे संचालक विजयी झाले.

भाजीपाला व्यापारी गट : शंकर लक्ष्मण पिंगळे (९९६), इतर वस्तू व्यापारी गट : विजय वनमालीदास भुता (३१६), धान्य व्यापारी गट : निलेश रमणीकलाल वीरा (४१२), कोकण : प्रभाकर (प्रभु) गोविंद पाटील (१८२), नाशिक : अद्वय प्रशांत हिरे (५१८) हे सदस्य अपक्ष आहेत.

नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला घवघवीत यश मिळाले. नाशिकच्या बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर होऊन काँग्रेसचे संपत सकाळे सभापती झाले. या सर्व  ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व सहकारी पक्षांना यश आले. राज्यात गेल्या पाच वर्षांत सहकार क्षेत्रात पाय रोवण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून बाजार समिती कायद्यात बदल करण्यात आले. काही महत्वाच्या बाजार समित्यांवर थेट नियुक्त्या करण्यात येत होत्या. त्यामुळे सहकार क्षेत्रातील विविध नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. 

मात्र, राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे निर्णय बदलण्याचा धडाका लावला. त्याचे राजकीय परिणाम आता दिसू लागले आहेत. सहकार हा महाराष्ट्रातील राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी महत्वाचे माध्यम मानले जाते. आतापर्यंत यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. दोन्ही काँग्रेसचे सहकारावर वर्चस्व होते. त्याला भाजपने काही प्रमाणात धक्का दिला होता. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर दोन्ही काँग्रेस त्यातून सावरण्याच्या जोरदार प्रयत्नात आहेत, असे सध्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com