मुंबई बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार : बाळासाहेब पाटील

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. महाविकास आघाडीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आज(गुरुवारी) उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे
Mahavikas Front to fight Mumbai Market Committee Election Say Balasaheb Patil
Mahavikas Front to fight Mumbai Market Committee Election Say Balasaheb Patil

सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित  लढणार आहे. महाविकास आघाडीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आज (गुरुवारी) उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता या निवडणुकीत कोणाचे किती उमेदवार रिंगणात असणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र राज्यात सत्ता स्थापन करताना झालेली शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी आता मुंबई बाजार समितीची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

आज महाविकास आघाडीच्याप्रमुख नेत्यांची बैठक झाली. या मध्ये हा निर्णय झाला असल्याचे सांगून बाळासाहेब पाटील म्हणाले, या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे आदींसह वरिष्ठ नेते उपस्थित होते.महाविकास आघाडीची यादी उद्या (गुरुवारी) जाहीर केली जाणार आहे. या आघाडीकडे उमेदवारांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com