मुंबई `एपीएमसी'त महाविकास विरुद्ध भाजप, आघाडीत बंडखोरी

सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
mahavikas and bjp tussle for apmc election 
mahavikas and bjp tussle for apmc election 

यवतमाळ : सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

अमरावती महसूल विभागातून दोन जागांसाठी 26 अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर अजूनही सात उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात कायम आहेत. अमरावती विभागातून महाविकास आघाडीतर्फे यवतमाळचे प्रवीण देशमुख तसेच मेहकरचे माधवराव जाधव यांचे नाव निश्‍चित केले असून भाजपनेही शड्डू ठोकल्याने चुरशीची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे.

देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे दिग्गजांचे लक्ष याकडे केंद्रीत झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींना राज्यशासनाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी मुंबई बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याप्रमाणेच होणार आहे. संचालक म्हणून आपली वर्णी लागावी, यासाठी आता चढाओढ सुरू झाली आहे. अमरावती महसूल विभाग मतदारसंघातील दोन जागांसाठी यावेळी तब्बल 26 अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी (ता.15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. 19 उमेदवारांनी माघार घेतली. यानंतरही सात उमेदवार रिंगणात आहेत. 

मुबंई बाजार समितीतही महाविकास आघाडीचे पॅनेल झाले आहे. अमरावती विभागात सात उमेदवार रिंगणात असल्याने काट्याची टक्कर होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी असली तरी सहकारात पक्ष नसतो, अशी चर्चा सुरू झाल्याने नेमका अर्थ काय? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार
अमरावती विभागातून प्रवीण देशमुख व माधवराव जाधव, नागपूर विभागातून सुधीर कोठारी व हुकुमचंद आमधरे, औरंगाबाद विभागातून अशोक डक व वैजनाथ शिंदे, नाशिक विभागातून रितेश पाटील व जयदत्त होळकर, पुणे विभागातून धनंजय पाडकर व बाळासाहेब सोळसकर यांचा समावेश आहे.

बंडखोर की पुरस्कृत?
मुबंई बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल झाले असले तरी त्यांच्या उमेदवारांना बंडखोरांचाच सामना करावा लागणार आहे. यवतमाळ, शेगाव येथून मंत्र्यांच्या जवळ असलेल्यांचे अर्ज कायम असल्यानेही बंडखोरी की पुरस्कृत उमेदवारी, अशी शंका आता उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com