mahavikas aghadi performs religious rituals to oppose girish mahajan | Sarkarnama

महाजनांनी साफसफाई केली, तिथेच गोमूत्र शिंपडून होमहवन झाले!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आमदार गिरीष महाजन हे गेल्या पंचवीस वर्षांपासून तालुक्‍यातील जनतेला भुलथापा देत असून, स्वत:ला 'आरोग्यदूत' म्हणून घेत आहेत. त्यामुळेच या रूग्णालयाला अवकळा लागलेली होती. ती आज आम्ही होमहवन व गोमुत्र शिंपडून दूर केली.

जळगाव : माजी मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपुर्वी जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात साफसफाई केली होती. त्याच रूग्णालयात जावून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून होमहवन करून शुद्धीकरण केले. 

आमदार गिरीष महाजन यांनी काही दिवसांपूर्वी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तिथे साफसफाई करून घेतली होती. त्यानतंर आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. त्याच उपजिल्हा रूग्णालयात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गेले, त्यांनी गोमूत्र शिंपडून व होमहवन करून शुध्दीकरण केले. 

याबाबत कार्यकर्त्यांनी सांगितले, कि आमदार गिरीष महाजन हे गेल्या पंचवीस वर्षांपासून तालुक्‍यातील जनतेला भुलथापा देत असून, स्वत:ला 'आरोग्यदूत' म्हणून घेत आहेत. त्यामुळेच या रूग्णालयाला अवकळा लागलेली होती. ती आज आम्ही होमहवन व गोमुत्र शिंपडून दूर केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल लोढा, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, माजी नगरसेवक अनिल बोहरा, माधव चव्हाण, विलास पाटील, जितेश पाटील, कॉंग्रेसचे शंकर राजपूत, किरण पाटील, गणेश झाल्टे, संजय जैन, रफीक मौलाना, शफी पेंटर उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख