हरिभाऊ जावळे यांच्यासह 28 सदस्यांना महाआघाडी सरकारने घरी पाठवले...

...
haribhau jawale
haribhau jawale

पुणे :  राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील सरकारने कृषी संलग्न असलेली कृषी व शिक्षण संशोधन परिषद, चारही कृषी विद्यापीठे व कृषी विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळावरील सदस्यांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्यासह २८ सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

राज्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्रात कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कृषी विद्यापीठाची कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ यांची निर्मिती करण्यात आली आहे.

मागील सरकारने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा) या पदावर
हरिभाऊ जावळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यावर २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात होती. सरकारने सर्वसदस्यांच्या
नियुक्त्या रद्द केल्या आहेत.  

पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर कृषी विद्यापीठ स्तरावरील एका अशासकीय नियुक्ती करण्यात आली होती. परिषदेवर एकूण पाच सदस्यांची नियुक्ती रदद् केली आहे. याशिवाय महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळावर अध्यक्ष असलेले डॉ. विजय मेहता यांचीही नियुक्त रद्द करण्याचे आदेश अवर सचिव उमेश चांदिवडे यांनी
दिले आहेत. त्यातच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर कृषी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी गेल्या दहा दिवसापासून आंदोलन
सुरू केले आहे. त्याचाही फटका अशासकीय सदस्यांना बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.    

रद्द केलेल्या नियुक्त्या 
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे ः हरिभाऊ जावळे, उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ः लिंबाजी भोसले, अजय गव्हाणे, बालाजी देसाई, शरद हिवाळे, पवित्राबाई सुरवसे, डॉ. आदिती सारडा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ः तुषार पवार, नाथाजी चौगुले, पंकजकुमार महाले, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, सुनिता पाटील, दत्तात्रय पानसरे,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल ः जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, स्नेहा हरडे, डॉ. अर्चना बारब्दे,

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली ः प्रविण देशमुख, डॉ. उदयसिंह पाटील, राजेश वानखेडे, अर्चना पानसरे,

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे ः तुषार पवार, मोरेश्वर वानखेडे, अर्चना पानसरे, अजय गव्हाणे, सुरेश थोरात (कृषी शास्त्रज्ञ)

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळ, पुणे ः डॉ. विजय मेहता, अध्यक्ष,
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com