mahavikas aaghadi and expences | Sarkarnama

महाविकासआघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला दोन कोटी 79 लाख रूपये खर्च

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

राज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. सांगली कोल्हापूरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पुरेशी मदत मिळू शकली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. राज्यात सर्वक्षेत्रात मंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या शपथविधीसाठी इतका खर्च करणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या शपथविधीला तब्बल दोन कोटी 79 लाख रूपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे. 28 नोव्हेंबरला (गुरवार) मुंबईत शिवाजी पार्कला हा शपथविधी पार पडला. महिनाभर चाललेल्या सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकार स्थापन झाले. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने सत्तास्थानावर विराजमान होणार असल्याने हा संपूर्ण सोहळा दिमाखादार पद्धतीने करण्यात आला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तास्थापनेआधी राज्यात महिनाभर राजकीय नाट्य सुरू होते. भारतीय जनता पार्टीपासून वेगळे होऊन शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जवळीक करून सत्ता स्थापन केली होती. त्याआधी अजित पवार यांना बरोबर घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा अयशस्वी प्रयोग केला होता. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सत्ता स्थापनेला विशेष राजकीय महत्व होते. त्यामुळे हा सोहळा दिमाखदार पद्धतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे आवश्‍यक होते. मात्र, शपथविधी समारंभाला इतका खर्च करणे योग्य आहे का ? असा प्रश्‍न आता विचारण्यात येऊ लागला आहे. 

राज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. सांगली कोल्हापूरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पुरेशी मदत मिळू शकली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. राज्यात सर्वक्षेत्रात मंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या शपथविधीसाठी इतका खर्च करणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख