महात्मा गांधी केवळ भारताचे नाहीत : नरेंद्र मोदी

महात्मा गांधी केवळ भारताचे नाहीत : नरेंद्र मोदी

न्यूयॉर्क, : संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आयोजित चर्चासत्रात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी यांच्या विचारांच्या कालसुसंगतीवर भाष्य करताना राष्ट्रपित्याचे मोठेपण अधोरेखित केले.

महात्मा गांधींचा जन्म भारतात झाला होता; पण ते केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, असे मतही त्यांनी मांडले. पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात ट्‌विट करत मोदींच्या भाषणाचा आढावा घेतला आहे.

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ विशेष स्टॅम्पचे प्रकाशन केले जावे, अशी विनंती मोदींनी केली. ""जी नेतेमंडळी महात्मा गांधी यांना कधीही भेटली नव्हती अशा मंडळींवरही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता,

यामध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि नेल्सन मंडेला आदींचा समावेश होता. महात्मा गांधींनी लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली, त्यांनी लोकांना सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला असेही मोदींनी सांगितले. 

समस्यांना उत्तर म. गांधी 
येथील मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस आणि अन्य जागतिक नेत्यांच्या हस्ते गांधी सोलर पार्क आणि गांधी पीस गार्डनचे उद्‌घाटन करण्यात आले.

आजमितीस जगासमोर वातावरणातील बदल, दहशतवाद आणि भ्रष्टाचार अशा समस्या आ वासून उभ्या असल्याने महात्मा गांधी यांचीच तत्त्वे जगाला तारू शकतात, असे मत आंतरराष्ट्रीय नेत्यांनी मांडले.

या वेळी पंतप्रधान मोदींसमवेत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई ईन, सिंगापूरचे पंतप्रधान ली शेन लूंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, जमैकाचे पंतप्रधान अँड्य्रू होलनेस आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आरदेर्न आदी उपस्थित होते. येथील सोलर पार्कची क्षमता ही 50 किलोवॉट एवढी आहे. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com