आरोग्य खर्चाचे आमदार गाडगीळांचे मॉडेल महाराष्ट्राने स्वीकारले 

अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आमदार अनंत गाडगीळ आघाडीवर असतात.
anant gadgil
anant gadgil

मुंबई : आमदारांनी पेव्हर ब्लॉकचे रस्ते अन क्रीडा साहित्यावर खर्च करण्याऐवजी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर खर्च करावेत, असे आवाहन कॉंंग्रेस विधान परिषदेतील  आमदार अनंत गाडगीळ सातत्याने करीत. त्यांच्या आमदार निधीतील रक्कम ते सरकारी रुग्णालयांना मुक्तहस्ते देत असतात. त्यांचे हे माॅडेल सरकारने आता स्वीकारले आहे.

त्यांच्या पत्नी सनदी अधिकारी मेधा गाडगीळ यांचाही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दांडगा अभ्यास आहे .कोविड १९ ची साथ पसरल्यावर तर त्यांच्या या तळमळीची तात्कालिकता वाढलीच. विधान परिषदेच्या निरोप समारंभातही गाडगीळांनी तेच आवाहन केले.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आवाहनाची दखल घेतली.

आमदारांना त्यांच्या निधीतील तब्बल अर्धा कोटी रूपये रुग्णालयांना देता येतील किंबहुना तसे ते द्यावेत असे सुचवणारा आदेश जारी करण्यात आला. उपाययोजनांसंबंधी आज काढलेल्या परिपत्रकात तसा उल्लेख आहे. ही नियमावली तयार करणार्या काही अधिकार्यांनी त्यांना  आवर्जून ही माहिती तर दिलीच पण या लोकोपयोगी निर्णयाचे श्रेयही दिले. या सूचनेचा लाभ घ्यावा कारण काळाचे ते आव्हान आहे, असे अनंत गाडगीळ या निर्णयानंतर `सरकारनामा`शी बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com