maharera | Sarkarnama

बांधकामातील पारदर्शकता, कार्यक्षमतेसाठी व ग्राहकहितासाठी "महारेरा'सज्ज - फडणवीस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई : बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी "महारेरा'सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित गौतम चटर्जी यांच्या शपथविधी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुख्य सचिव सुमीत मलिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव संजीवकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष सुभाष लाखे-पाटील उपस्थित होते. 

श्री.फडणवीस म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या प्राधिकरणामुळे लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होऊन सामान्य माणसाला न्याय मिळेल. प्रारंभी श्री. मेहता यांनी श्री.चटर्जी यांना शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. चटर्जी यांनी प्राधिकरणाने हाती घेतलेल्या विविध कामांचे सादरीकरण केले. 

गौतम चटर्जी यांचा परिचय 
श्री. चटर्जी हे 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महसूल व वन विभाग, मुंबई मनपा, म्हाडाचे उपाध्यक्ष, गृह विभाग आदी विविध विभागात त्यांनी काम केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख