maharastra politics, yavatmal district, shivsena clashes | Sarkarnama

यवतमाळ जिल्हाप्रमुखपदावरून राठोड-गवळी वाद 

गोविंद तुपे 
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई ः मागील काही महिन्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेच्या गवळी-राठोड या दोन नेत्यांतील वाद जिल्हाप्रमुख पदावरून आणखी चिघळला आहे.

या वादात शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही अद्याप काही मार्ग निघाला नाही. त्यामुळे तो वाद मातोश्रीवर पोहचला. या पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचे फर्मान निघाले आहे. यामुळे राठोड गवळी वाद असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती शिवसेनेची बनली आहे. 

गेल्या आठवड्यात संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा शिवसेनाप्रमुखपदी संतोष ढवळे यांना हटवून त्यांचे विश्वासू पराग पिंगळे यांची नियुक्ती केली. यासंदर्भातील आदेश थेट मातोश्रीवरून आणले मात्र आपल्याला न विचारता पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आल्यावरून खासदार भावना गवळी भडकल्या. त्यांनी मातोश्रीवर धाव घेऊन पिंगळे यांच्या नियुक्तीवर स्थगिती मिळविली. त्याचबरोबर याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांच्या बाजू ऐकूण घेतल्यानंतरही हा वाद मिटला नाही. त्यामुळे हा वाद मिटविण्याची धुरा रामदास कदम यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सोपावली आहे. त्यानंतर कदमांनीही एक पाऊल पुढे घेत गवळी यांच्याशी चर्चा केली पण कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद भावना गवळी यांच्याकडून कदम यांना मिळाला नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. 

विधानभवानातील रामदास कदम यांच्या दालनात जाऊन राज्यमंत्री संजय राठोड यांनीही कदम यांच्याकडे आपली कैफीयत मांडल्याचे समजते आहे. एवढेच नाही तर आम्ही तुमच्या किती जवळचे आहोत याचा पाढाच राठोड यांनी कदम यांच्या समोर वाचून दाखविल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांच्या विरोधी भूमिकेमुळे कुणाच्या पारड्यात वजन टाकायचे या विवंचनेत असलेल्या रामदास कदमांनी संजय राठोड यांना सबुरीचा सल्ला देत पक्ष आदेश सर्वांनाच मान्य करावे लागतील असा इशाराही दिला आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या मतभेदाचा फटका पक्षाला बसणार आहे. त्यामुळे यावादात मध्य कसा साधायचा हा रामदास कदम यांच्यापुढील प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख