महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात  1000 मेगावॉट विजेची बचत होणार 

महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात  1000 मेगावॉट विजेची बचत होणार 

मुंबई : विजेची मागणी आणि ऊर्जा संवर्धन करून विजेची बचत करण्यासाठी सरकारने आज नवीन ऊर्जा संवर्धन धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. या नवीन धोरणामुळे पुढील 5 वर्षात 1 हजार मेगावॉट ऊर्जेची बचत होणार असल्याचा दावा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला 

या धोरणानुसार सरकार अधिकाधिक सौर ऊर्जेवर भर देण्यात आला आहे. सरकारी , आणि खाजगी जमिनीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प उभे करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होणार नाही, व त्यासोबतच प्रदूषण कमी होईल यासाठी हे धोरण महत्त्वाचे ठरणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले 
ऊर्जा संवर्धन कायदा-2001 ची प्रभावी अंमलबजावणी करून त्यासाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील आणि त्यानुसार येत्या 5 वर्षात 1 हजार मेगावॉट विजेची बचत केली जाईल. यामुळे वीज ऑइल, गस, याची बचत होईल, त्यामुळे अनुदानाचा बोजा कमी होईल.. 

शेतकऱ्यांसाठी सौर कृषी वहिनी योजना 
शेतकऱ्यांना माफक आणि पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना सोयीने सहजपणे वीज मिळेल यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. 

सौर कृषी फिडरची ही योजना सरकारच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फिडरचे विलगीकरण झाले आहे आहे अशा ठिकाणी कृषी फिडरचे सौर कृषी उर्जाद्वारे विधुतीकरण करण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. 

राज्यात सद्या 30 टक्के वीज ही कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते त्यात या योजनेमुळे भर पडणार आहे. या योजनेसाठी लागणारी जमीन 30 वर्षाच्या मुदतीसाठी दिली जाणार आहे. गरज पडल्यास खाजगी जमीन मालकांचीही जमीन यासाठी घेतली जाईल अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com