ऑक्‍टोबरमध्ये महाराष्ट्रात महासंग्राम ! 

ऑक्‍टोबरमध्ये महाराष्ट्रात महासंग्राम ! 

मुंबई :चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 15 ते 20 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता आहे. तर दिवाळी आधी म्हणजे आँक्‍टोबरपूर्वी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाऊ शकतात. 

2014 प्रमाणे यंदाही राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान अपेक्षित आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ऑक्‍टोबर महिन्यात होऊ घातल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्‍सेना, सुदीप जैन आणि चंद्रभूषण कुमार उद्या (बुधवार) मुंबईत येत आहेत. 

हे अधिकारी 5 सप्टेंबरला मंत्रालयात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. आयोगाचे अधिकारी जिल्हाधिकार्यांशी व्हिडीओ कान्फरन्सद्वारे संवाद साधतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी मंगळवारी दिली. 

भारत निवडणूक आयोगाकडून आक्‍टोबर महिन्यात हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा अपेक्षित आहे. या दोन्ही राज्यांच्या विधानसभेची मुदत अनुक्रमे 2 आणि 9नोव्हेंबर 2019रोजी संपत आहे.

त्यामुळे आक्‍टोबर महिन्यात दिवाळी आधी म्हणजे 25 आक्‍टोबरपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करून राज्याचे नवे मुख्यमंत्री 31 आक्‍टोबरपूर्वी शपथ घेतील, अशी अपेक्षा आहे. 

चौदाव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा अनंतचतुदर्शीनंतर म्हणजे 12 सप्टेंबर नंतर होऊ शकते. भारत निवडणूक आयोग 13 ते 15सप्टेंबरच्या दरम्यान विधासभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

पाच वर्षापूर्वी आयोगाने तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा 12 सप्टेंबर 2014 रोजी केली होती. त्यावेळी 15आक्‍टोबरला मतदान होऊन 19आक्‍टोबरला निकाल जाहीर करण्यात आले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com