सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शरद पवारांना साकडे

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे आलेल्या शरद पवारांची महाराष्ट्र एकीकरणसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच विविध विषयांवर चर्चा केली
Maharasthra Border Committee Meets Sharad Pawar
Maharasthra Border Committee Meets Sharad Pawar

बेळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक त्या सूचना कराव्यात अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे.                                                     

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे आलेल्या शरद पवारांची समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच विविध विषयांवर चर्चा केली.  सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत समिती नेत्यांबरोबर चर्चा करून काही महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. या निर्णयांची सुनावणीची तारीख येण्या अगोदर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. 

या करिता आवश्यक त्या सूचना संबंधिताना कराव्यात अशी मागणी केली तसेच गेल्या महिन्यापासून सीमाभागात कन्नड संघटना व प्रशासनाकडुन सुरू असलेल्या अन्यायाची तसेच वस्त्रोद्योग मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर याना झालेली अटक व खासदार संजय राऊत यांना पोलिसांनी दिलेली वागणूक याबाबत पवार यांना माहिती दिली. यावेळी पवार यांनी आपल्याला अन्यायाची माहिती असून याबाबत संबंधीत मंत्री व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जातील असे, आश्वासन दिले. यावेळी मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, प्रकाश पाटील, सुनील आनंदाचे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालक मंत्री सतेज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com