#MaharashtraBudget2020 : अर्थमंत्र्यांचे केवळ पोकळ भाषण - देवेंद्र फडणवीस

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेले बजेट हे केवळ पोकळ भाषण आहे. त्यापलीकडे त्यात काहीच नाही. मंदीची भिती दाखवून अपयश लपवण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
finance minister delivered only empty speech says devendra fadanvis
finance minister delivered only empty speech says devendra fadanvis

पुणे - अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेले बजेट हे केवळ पोकळ भाषण आहे. त्यापलीकडे त्यात काहीच नाही. मंदीची भिती दाखवून अपयश लपवण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचे जाहीर सभेतील भाषण एेकले. पहिल्यांदा अर्थसंकल्याच्या भाषणामध्ये केवळ भाषण होते. आकडेवारी नव्हती. अर्थविश्लेषण नव्हते. नवीन वर्षांत अपेक्षित काय आहे ? किती तूट अधिक राहील. या कोणत्याही गोष्टी त्यात नव्हत्या. तूट प्रचंड वाढली आहे. 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागाला काहीही दिले नाही. कोकणाचा उल्लेख करून फक्त पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडालाही पाने पुसली  आहेत.  कर्जमाफीची घोषणा केली. मुदत कर्जाबाबत घोषणा नाही. त्यामुळे पीककर्जाशिवाय कोणतेही कर्जमाफ होणार नाहीत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 50 हजार, 25 हजार हेक्टरी मदत करून असे वचन दिले होते. सत्तेचे वचन यांना लक्षात आहे. पण शेतकऱ्यांना एक नया पैसा दिला नाही, अशीही टीका फडणवीस यांनी केली. 

केंद्राच्या भरवस्यावर योजना जाहीर केला आहेत. पेट्रोल-डिझेमुळे सामान्यांवर बोजा पडणार. सौर पंप योजना सुरू केली. ही केंद्राची जलयुक्त शिवाय योजना बंद केली. मुख्यमंत्री जलसंधारण योजना म्हणून आता ही योजना सुरू केली. 10 लाख तरुणांना रोजगार देणार, अशी घोषणा केली. मात्र हा रोजगार नाही. अॅप्रेटिस देणार आहे, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com