बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पोटात गोळा आणणारे समीर वानखेडे नक्की कोण?

समीर वानखेडे हे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत. २०१७ मध्ये वानखेडे क्रांती यांंच्यासोबत विवाहबंधनात अडकले.
बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पोटात गोळा आणणारे समीर वानखेडे नक्की कोण?
सरकारनामा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलीवूडची ड्रग्ज मंडळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ( NCB) रडारवर आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने गेल्या एका वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. त्यानंतरही एनसीबीने अनेक धडाकेबाज कारवाया करत ड्रग्ज पेडलर्सच्या पोटात गोळा आणला आहे. सुशांतपासून शाहरुख खानच्या मुलापर्यंत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer Wankhede) यांनी कोणत्याही राजकारणी किंवा सेलिब्रिटीला न जुमानता या कारवाया केल्या. त्यानंतर अगदी सोशल मिडीयापासून ते वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स मध्येही समीर वानखेडेचे नाव आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पोटात गोळा आणणारे समीर वानखेडे नक्की कोण?
पँडोरा पेपर्स: कर वाचवण्यासाठी सचिन तेंडूलकरची परदेशात गुंतवणूक?

पण कोण आहेत हे समीर वानखेडे?

समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. वानखेडे यांनी एनसीबीसोबत काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त एसपी म्हणून काम केले आहे. यासह त्यांनी महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)चे सहआयुक्त म्हणूनही काम केले.

-वानखेडे काम करण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. जेव्हा ते मुंबई विमानतळावर कस्टम विभागात होते, तेव्हा तो बॉलिवूड सेलिब्रिटींच्या त्रासाला कंटाळले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींचे सामान हे त्यांच्या त्रासाचे कारण होते.

-समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंगला विदेशी चलनासह पकडले होते. इतकेच नव्हे तर 2011 ची विश्वचषक ट्रॉफी मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी ड्युटी चार्ज भरल्यानंतरच सोडली होती. वानखेडेंबद्दल स्वतः बॉलिवूडचे चाहते आहेत, त्यांना या उद्योगाबद्दल कोणताही द्वेष नाही, असेही म्हटले जाते.

- समीर वानखेडे यांची 2010 मध्ये महाराष्ट्र सेवा कर विभागात बदली झाली. त्यानंतर समीर यांनी कर चुकवल्याप्रकरणी 200 बॉलिवूड सेलिब्रिटींसह 2500 लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी फक्त दोन वर्षात तिजोरीत 87 कोटी रुपयांचा महसूल जमा केला.

- 22 नोव्हेंबर 2020 रोजी औषध विक्रेत्यांच्या हल्ल्यात वानखेडे आणि एनसीबीचे इतर पाच अधिकारीही जखमी झाले होते. समीर यांना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र त्यांचे दोन साथीदार या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.

- समीर वानखेडे हे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com