महाराष्ट्र हादरला! रुग्णालयाच्या गोबरगॅस टाकीत १ भ्रूण आणि ५ कवट्या

wardha crime news| abortion of minor girl pregnant | वर्ध्यासह राज्यभरात एकच खळबळ
Crime
Crime Sarkarnama

वर्धा : येथील आर्वी शहरातील कदम रुग्णालयात अत्यंत धक्कादायक आणि संताप आणणारा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर रेखा कदम (Doctor Rekha Kadam) यांनी गर्भपात करुन जमिनीत पुरलेले भ्रूण पोलिसांनी जप्त केले असून यावेळी खोदकाम केल्यानंतर आणखी पाच कवट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याशिवाय रक्ताने माखलेले कपडे आणि एक गर्भपिशवी आढळून आली आहे. त्यामुळे वर्ध्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच राज्याला पुन्हा एकदा परळीमधील २०१२ सालच्या डॉ. सुदाम मुंडे (Doctor Sudam Munde) प्रकरणाचीही आठवण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्धामधील आर्वी शहरातील अल्पवयीन मुलीचा कदम रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांनी ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर कदम यांच्यासह अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना अटक केली होती. या तिघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. मंगळवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पु्न्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना कारागृहात तर डॉ. कदम यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली होती.

Crime
अजितदादा बोट दाखवतील तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष; ५ नाव चर्चेत

दरम्यान, तपासावेळी गर्भपात करण्यात आलेला भ्रूण जप्त करण्यासाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह पालिका पथकाला पाचारण केले होते. यावेळी डॉक्टर रेखा कदम यांच्या रूग्णालयाच्या मागील परिसरात बायोगॅस प्रकल्पाचा खड्डा होता मात्र तो वापरात नसल्याने या खड्ड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. याठिकाणी खोदकाम केले असता अत्यंत धक्कादायक माहिती राज्यासमोर आली.

Crime
राऊतांचे प्रयत्न वाया जाणार? 'मविआ'च्या जागा वाटपात काँग्रेसचा खोडा

या खोदकामावेळी पोलिसांना जमिनीत पुरलेले भ्रूण जप्त तर केलेच, पण शिवाय खोदकाम केल्यानंतर आणखी पाच कवट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याशिवाय रक्ताने माखलेले कपडे आणि एक गर्भपिशवी आढळून आली आहे. सुमारे तीन ते चार तास खोदकाम सुरू होते. या सर्वांचे पोलिसांनी चित्रीकरण केले असून कदम हॉस्पिटलमधून सर्व रेकॉर्ड पोलिसांनी जप्त करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी आणि विशेष पोलिस उपनिरीक्षक ज्योस्तना गिरी यांनी दिली. दरम्यान हे जप्त करण्यात आलेले अवशेष आता डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार असून हे अवशेष जनावराचे की माणसाचे आहेत याबाबतची माहिती अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in