चार महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येणार
चार महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई : राज्यभरातील जिल्हा बॅंकांच्या निवडणूकांनंतर आता चार महानगरपालिकांच्या रिक्तपदासाठी पोटनिवडणूका होणार आहेत. धुळे(Dhule) , अहमदनगर (Ahamadnagar), नांदेड- वाघाळा (Nanded-Waghala) आणि सांगली-मिरज-कुपवाड (Sangali-Miraj-Kupwad) या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी पुढील महिन्यात 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (UPS Madan) यांनी येथे दिली.

या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर संबंधित प्रभागात आजपासून (24 नोव्हेंबर) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता अंमलात राहणार असल्याचंही आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.

चार महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान
मोठी बातमी : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ईडीची नोटीस

29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. तर 5 डिसेंबरला शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 9 डिसेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होईल.

पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे : धुळे- 5ब, अहमदनगर- 9क, नांदेड वाघाळा- 13अ आणि सांगली मिरज कुपवाड- 16अ,

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येणार असल्याची माहिती मदान यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उमेदवार, मतदार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. याचबरोबर या ॲपमध्ये आता मतदार नोंदणीही करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in