विक्रम गोखले म्हणजे भूखंड विक्रीत फसवणूकीच्या गुन्हामुळे अडचणीत सापडलेला माणूस

कंगना जे म्हणाली ते खरंय, मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो.
विक्रम गोखले म्हणजे भूखंड विक्रीत फसवणूकीच्या गुन्हामुळे अडचणीत सापडलेला माणूस
Vikram Gokhalesarkarnama

पुणे : अभिनेते विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावतने (kangana ranaut) स्वातंत्र्याच्या केलेल्या विधानाचे समर्थन केले, सोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) व त्याचा मुलगा आर्यन खानवरही ( Aryan Khan) हल्लाबोल केला. मात्र यात अभिनेत्री कंगनाच्या विधानाला समर्थन देण्याच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर राजकीय पक्ष आणि लोकांमधून टीका केली जात आहे.

"१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले आहे," असे विधान कंगनाने केले आहे. तिच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलेच ट्रोल केले. अनेक राजकीय नेत्यांनीही तिच्या या विधानानाचा समाचार घेतला. विक्रम गोखले यांनी मात्र, कंगनाच्या विधानाचे समर्थन केले. ते म्हणाले, ''कंगना जे म्हणाली ते खरंय, मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो,''

 Vikram Gokhale
मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?

गोखले यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे, ट्विट करत ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात भूखंड विक्रीच्या प्रकल्पात (गिरीवन) गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत सापडलेला माणूस म्हणजे विक्रम गोखले. त्यांचे वक्तव्य म्हणजे माहेरच्या साडीतील अभागी बाबा सारखेच!

यावेळी गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तृतीही केली. तसेच लाल बहादूर शास्त्री सोडून मी देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो, पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबर ला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे,'' असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in