कोणाची माय व्यायली आहे, माझ्यावर टीका करायला - विक्रम गोखले

विक्रम गोखले यांनी त्यांच्यावर झालेल्या टिकेवर स्पष्टीकरण दिले आहे.
कोणाची माय व्यायली आहे, माझ्यावर टीका करायला - विक्रम गोखले

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला समर्थन दिले. त्यानंतर त्यांना विरोध करणारे आणि त्यांना समर्थन करणारे आमनेसामने आले आहेत. त्यावर विक्रम गोखले यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

'माझ्या बाजूने मला हा विषय संपवायचा आहे, ज्या विवादित मुद्यावर हा गदारोळ चालू आहे त्यावर मी बोलणार आहे. माझ्या 76 व्या वाढदिवशी जे भाषण झालं ते मूळ दाखवलं गेलं नाही. त्यामुळे हा गोंधळ सुरु आहे. मी काय बोलतोय हे मी पण रेकॉर्डिंग करतोय, असही त्यांनी सांगितलं.

कोणाची माय व्यायली आहे, माझ्यावर टीका करायला - विक्रम गोखले
राजकीय भयातून कृषी कायदे रद्द; संजय राऊतांची टीका

माझ्या 76 व्या वाढदिवशी जे भाषण झालं ते मूळ दाखवलं गेलं नाही. त्यामुळे हा गोंधळ सुरु आहे. ते भाषण जर पुर्ण कोणी ऐकलं तर, कोणाची माय व्यायली आहे, माझ्यावर टीका करायची. जो धर्म एका विशिष्ट गोष्टीला मानत नाही, त्याला कापून टाका, त्याचा शिरच्छेद करा, त्याचे तुकडे करा असं म्हणतो, त्याला ही सत्ता ओरबाडून घ्यायची आहे, त्याला सत्तेची भुक लागली आहे. असे काही राजकीय पक्ष आहेत, त्यांना देश एकसंध राहावा असे वाटत नाही. मला आशा सुडो सेक्युलॅरिझम जपणाऱ्या राजकारण्यांचा राग येतो, अशा शब्दात विक्रम गोखलेंनी टिकाकरांना फटकारलं आहे.

ज्याला अमेरिकेने विझा नाकारलेला आज त्या व्यक्तीला पहिल्या 10 मध्ये सन्मान होते हे काही लोकांना पाहवत नाही. या देशात आम्हाला भीती वाटते निघून जावस वाटत, असे म्हणण्याचा धाडस जेव्हा संसदीय लोकशाही मध्ये करता तेव्हा तो देश लोकशाहीचा आहे हे सिद्ध होत. तरीही तुम्हाला अजून कसलं स्वातंत्र्य हवे.

समविचारी राजकीय पक्ष एकत्र येऊन आपल्या छाताडावर नाचू नये, या भीतीने सगळे राजकीय पक्ष यांच्याबाबत माझं हे भाष्य आहे, कोणीतरी वेगळा माणूस देशाकरता काही करतो हे म्हटल्यावर तो थरकाप होते होणार त्या भीतीने बाकीचे भुंकायला सुरुवात करतात, अशा शब्दात त्यांनी टिकाकारांना फटकारले आहे. सत्तेत कोणीही असो आपला देश बळकट असला पाहिजे. त्याकरिता मी इस्राहिल ला 100 टक्के मार्क देतो, असंही विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.

या देशातला प्रत्येक नागरिक माझा आहे, या देशावर, मातीवर प्रेम करणारा, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो माझा आहे, देशासाठी प्राण देणारा माझा, हे मी बोललो, त्यात काय चुकलं. ते लोक जात धर्म खुंटीला टांगून जे लोक सीमेवर पहारा देत आहेत, ते माझे नायक आहेत. पण आपल्या देशासाठी प्राण दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांची तत्कालीन मंत्रीमंडळाने दखल घेतली नाही, निधड्या छातीने लढणाऱ्या प्राण दिले, त्या तिघांना वाचवू शकले असते, जालियन वाला बाग हत्याकांडाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही.

जनरल डायरला गोळ्या घालणारा आरोपी आहे, हे सांगणारा, हा खोटारडेपणा मला पटत नाहीत. मी जे बोलतोय ते तुम्ही दाखवत नाही. ही पत्रकार परिषद मिडीयावर राग व्यक्त करायला नाही. माध्यमांच्या खोट्या आरोपांमुळे माझ्यासारख्या माणसावर अन्याय होतो. तेव्हा मी काय करणार, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in