झेडपीचे सरस प्रदर्शन म्हणजे केदार गटाचा कार्यक्रम; विरोधकांचा आरोप !

या प्रदर्शनाचे फलित काय, असा प्रश्‍न करीत हे प्रदर्शन म्हणजे केवळ केदार (Minister Sunil Kedar) गटाचा शक्तिप्रदर्शन कार्यक्रम होता, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
Nagpur ZP, Sunil Kedar
Nagpur ZP, Sunil KedarSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेने (ZP) महिला बचत गटांसाठी तीन दिवसीय सरक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यासाठी तब्बल १ कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात विक्री ६७ लाखांची झाली. त्यामुळे या प्रदर्शनाचे फलित काय, असा प्रश्‍न करीत हे प्रदर्शन म्हणजे केवळ केदार (Minister Sunil Kedar) गटाचा शक्तिप्रदर्शन कार्यक्रम होता, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.

प्रदर्शनाचा खर्च १ कोटी आणि विक्री केवळ ६७ लाख. मागील वेळी हे आकडे उलट होते. त्यामुळे सरस प्रदर्शनावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. सरस प्रदर्शनात १५० महिला बचत गटांचे स्टॉल होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा ३५ लाखांचा निधी व कृषी विभागाने ३० लाखांचा निधी दिला. तसेच उर्वरित निधी महिला बाल कल्याण, आरोग्य विभागाने दिला. यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा पंधरा दिवसांपासून राबत होत्या. शिवाय महिलांच्या प्रवासासाठी जवळपास १ हजार वाहनांची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने व्यवस्था कोलमडल्याची चर्चा असून अनेक महिला उपाशी गेल्याचा आरोपही विरोधकांनी केला.

शिवाय सरस प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद लाभला. शहरापासून प्रदर्शनी लांब असल्याने शहरातील नागरिक खरेदीपासून वंचित राहिले. गत तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्रदर्शनात दोन कोटींच्यावर उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. शिवाय त्यावरील खर्चही कमी होता. परिणामी, चार विभागांनी आयोजित केलेली व कोटीवर खर्च असताना तसा लाभ बचत गटांना झाला नसून केवळ पक्षाचा कार्यक्रम ठरला, असा आरोप विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असताना प्रोटोकॉलही पाळला नसल्याचा आरोप विरोधकांचा आहे.

शासकीय कार्यक्रम असताना प्रोटोकॉलचे कुठेही पालन करण्यात आले नाही. कृषी विभागाकडून ३० लाख घेतले असताना सभापतींना व्यासपीठावर जागा न देता खाली बसविले. पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रदर्शनाला भेट दिली असताना एकही पदाधिकारी हजर नव्हते. हा कार्यक्रम केवळ केदार गटाचा होता.

Nagpur ZP, Sunil Kedar
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

आतिश उमरे, विरोधी पक्षनेते, जि.प.

मच्छीमार संस्थांची लीज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, ७ हजार महिलांना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. मेळाव्यातून महिलांना कोणते प्रशिक्षण दिले. हे कळायला मार्ग नाही. सत्ताधाऱ्यांनी केवळ शक्तिप्रदर्शन केले.

संजय झाडे

जिल्हा परिषद सदस्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com