ZP : जिल्हा परिषद उपाध्यक्षाचा रेल्वेत धिंगाणा; पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

Amba Express : इगतपुरी येथे गाडी आली असता त्यांनी रेल्वेत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.
Amba Express at Akola
Amba Express at AkolaSarkarnama

Akola ZP Member News : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्या विरोधात नाशिक रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल मंगळवारी रात्री अमरावती एक्स्प्रेसने मुंबईहून परत येताना रेल्वेच्या डब्ब्यात धिंगाणा घातल्यामुळे नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली.

अकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर (वंचित बहुजन आघाडी) हे मंगळवारी रात्री अमरावती एक्स्प्रेसने अकोल्याकडे परत येत होते. या रेल्वेतील बोगी क्रमांक ‘बी - १’मध्ये ४८ क्रमांकाची सीट फाटकरांची होती. दरम्यान इगतपुरी येथे गाडी आली असता त्यांनी रेल्वेत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सहप्रवाशांनी त्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासन व पोलिसांकडे तक्रार केली.

इगतपुरी रेल्वे स्थानकावर त्यांना समज देण्यात आली होती. रेल्वे तिकीट तपासनिसांनी त्यांची समजूतही काढली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रेल्वे प्रशासनाने नाशिक रोड रेल्वे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. नाशिक रोड पोलिसांनी रात्री नाशिक रेल्वे स्टेशनवर गाडी पोहोचल्यानंतर फाटकर यांच्यासह अन्य एका व्यक्तीवर कलम १२ आणि ११७ प्रमाणे कारवाई (सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे तसेच असभ्य वर्तन करणे) करत त्यांना समजपत्र देऊन सोडून दिले.

थोड्या वेळानंतर फाटकर दुसऱ्या रेल्वेने अकोल्यात दाखल झाले. दरम्यान, सुनील फाटकर यांनी कारवाई झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र, आपण मद्यप्राशन केलं असल्याचं त्यांनी खंडन केलं. त्यांनी आपल्याला हे बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. पदाधिकाऱ्यांना जनतेने निवडून दिले असते. त्यांच्याकडून सभ्य वर्तनाची अपेक्षा असते. पण काही लोकप्रतिनिधी सत्तेच्या नशेत अशी कृत्ये करतात. त्याचा त्रास सामान्य लोकांना सहन करावा लागतो.

Amba Express at Akola
Budget 2023 News : कोणत्या मंत्रालयाला किती निधी? 'संरक्षण' पहिल्या क्रमांकावर, तर 'रेल्वे' तिसऱ्या स्थानी!

लोकप्रतिनिधी असले तरीही केवळ समज देऊन सोडणे, हे योग्य नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. निवडणुकीत निवडून आले म्हणून काहीही करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत नाही. पोलिसांनी (Police) केवळ समज देऊन सोडायला नको होते, तर सुनील फाटकर यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी होती. जेणेकरून पुन्हा ते असे कृत्य करणार नाही, अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या.

अमरावती (Amravati) एक्सप्रेसमधील सहप्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार सुनील फाटकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेल्वेत (Railway) इतर प्रवाशांना त्रास होईल, अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

- श्री कुळकर्णी, पोलिस निरीक्षक, नाशिक रोड रेल्वे पोलिस स्टेशन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com