ZP School : जेवनाळ्यातील तरुणांनी सुरू केली जिल्हा परिषदेची शाळा !

Bhandara : मागील आठवड्यापासून बेमुदत संप पुकारल्यामुळे शाळा बंद होती.
Bhandara ZP School
Bhandara ZP SchoolSarkarnama

Bhandara District ZP School News : गाव करी ते राव ना करी, या उक्तीप्रमाणे गावातील तरुणांनी संपामुळे बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा सुरू केली आहे. आदर्श घालून देणारे हे तरुण भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा या गावातील आहेत. हे तरुण आता मुलांना धडे देणार आहेत.

आज सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुटला असला तरी, १४ मार्चपासून शाळा बंद होती. गावकऱ्यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळा सुरू झाली आहे. गावातील शिक्षित तरुणांनी पुढाकार घेतल्याने हे शक्य होऊ शकले. त्यामुळे गावातील शिक्षित तरुण हे आता विद्यार्थ्यांना धडे देणार आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यापासून बेमुदत संप पुकारल्यामुळे शाळा बंद होती. (The school was closed due to an indefinite strike)

शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जेवनाळा ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून आज शाळा सुरू करत स्वयंसेवकांच्या माध्यमातून अध्यापन कार्य सुरू केले आहे. विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारल्याने जनसामान्यांची परवड झाली. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकही या संपात सहभागी झाल्याने १४ मार्चपासून शाळाही बंद होत्या.

जिल्ह्यातील (Bhandara) शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेत लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत पदाधिकारी व शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आज सोमवारी सकाळपाळीत शाळा सुरू करण्यात केली. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या पुढाकारातून सकाळी जिल्हा परिषद (ZP) शाळेचे फाटक उघडण्यात आले.

Bhandara ZP School
Bhandara - Gondia News: ५ ब्रास वाळूचा प्रश्‍न मिटला, परिणय फुकेंनी केला होता पाठपुरावा !

शाळेत वर्ग घेण्यासाठी गावातील सुशिक्षित बेरोजगारांना आमंत्रित करण्यात आले. दरम्यान त्याला प्रतिसाद देत शाळेतील सातही वर्गांत अध्ययन व अध्यापन कार्य सुरू करण्यात आले. यासाठी गावातील शिक्षित तरुणांनी हिरिरीने सहभाग घेत आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मोफत सेवा देण्याचा निर्धार केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटल्यामुळे तरुणांनी सुरू केलेली शाळा केवळ एका दिवसाची ठरली. पण या गावाने आदर्श घालून दिला, हे निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com