जि.प. सभापती निवडणूक : राष्ट्रवादीच्या बंग गटाला धक्का देत, महाविकासचा एकतर्फी विजय!

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. कॉंग्रेसचे राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळू ऊर्फ प्रवीण जोध विजयी झाले आहेत.
Mahavikas Aghadi in ZP
Mahavikas Aghadi in ZPSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेच्या (ZP) सभापतिपदांच्या निवडणुकीत कॉंग्रेसने माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने चारही सभापतिपदे काबीज केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील देशमुख गटाला एक सभापतिपद देत बंग गटाला कॉंग्रेसने जबर धक्का दिला आहे.

दिनेश बंग यांना सभापती मिळावे, यासाठी बंग गटाचा आग्रह होता. परंतु, स्थायी समितीसह गट नेतेही पदही त्यांच्याकडे असल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोध झाला. काटोल मतदारसंघाला गेल्यावेळी पद न मिळाल्याने या मतदारसंघात ते देण्याची मागणी देशमुख गटाची होती. त्यामुळे शेवटी देशमुख गटाच्या बाळू जोध यांना उमेदवारी देण्यात आली. चार सभापती पदांसाठी काल झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. कॉंग्रेसचे (Congress) राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळू ऊर्फ प्रवीण जोध विजयी झाले आहेत.

उमेदवारी संदर्भात काल सकाळीच कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सभापती पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते. नावे जाहीर करताच काहींना धक्का बसला. रामटेक विधानसभा मतदारसंघातून दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा असताना राजकुमार कुसुंबे यांचे नाव जाहीर केले. ते सुनील केदार यांचे विश्वासू मानले जातात. मिलिंद सुटे यांच्या नावाला उमरेडमधील काही नेत्यांनी विरोध केल्याची माहिती होती. पण केदार व माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची बाजू घेतल्याने त्यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ३८ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवारांना केवळ १३ मतांवर समाधान मानावे लागले.

कंभाले, कवरे, झाडेंसह सहा अनुपस्‍थित, मानकर तटस्थ..

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवणारे नाना कंभाले व प्रितम कवरे हे अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे शिवसेना (शिंदे समर्थक) सदस्य संजय झाडे यांनी सुद्धा येणे टाळले. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी भाजपचे संख्याबळ कमी केले. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते आतिश उमरे, राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व कॉंग्रेस सदस्य शंकर डडमलही अनुपस्थित होते. मागील निवडणुकीत बंडखोरांना मतदान करणाऱ्या मेघा मानकर यांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

भाजपने ऐनवेळी घेतला निवडणुकीचा निर्णय..

सकाळीच भाजपची बैठक झाली होती. यात निवडणूक लढावी की नाही, याबाबत चर्चा झाली. कॉंग्रेस सदस्यांची साथ मिळणार नसल्याने ही निवडणूक न लढण्याबाबत काहींचा सूर होता. निवडणूक न लढल्यास वेगळा संदेश जाईल, असाही सूर निघाल्याने ऐनवेळी भाजपने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. विरोध पक्षनेते अनुपस्थित असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. निवडणुकीच्या काळात ने बाहेर गेल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

Mahavikas Aghadi in ZP
गडकरींनी ठरवले; नागपूर-हैदराबाद साडेतीन तासांत, तर पुण्यासाठीही होणार मोठा रस्ता !

उमेदवार त्यांना मिळालेली मते -

शिक्षण व अर्थ सभापती (संभाव्य)

राजकुमार कुसुंबे (कॉंग्रेस) - ३८

प्रमिला दंडारे (भाजप) - १३

कृषी समिती (संभाव्य)

बाळू जोध (राष्ट्रवादी) - ३८

सतीश दंडारे (भाजप) - १३

समाजकल्याण समिती

मिलिंद सुटे (कॉंग्रेस) - ३८

सुभाष गुजरकर - १३

महिला व बाल कल्याण समिती

अवंतिका लेकुरवाळे (कॉंग्रेस) - ३८

पुष्पा चाफले (भाजप) - १३

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in