जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर आगामी निवडणुकांची छाप !

उपाध्यक्ष पद सावनेर विधानसभा मतदार संघाकडे आहे. या मतदार संघातून मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) स्वतः आमदार आहेत.
जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर आगामी निवडणुकांची छाप !
Sunil KedarSarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. समोर लोकसभा व विधानसभा निवडणूक असून ते लक्षात घेत विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेतील (ZP) विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ १७ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी अध्यक्ष पदाकरिता आरक्षण सोडत निघणार असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीनंतर चार सभापती पदांकरिता निवडणूक होईल. या पदावर नियुक्ती मिळण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. परंतु येत्या दोन्ही निवडणुका लक्षात घेऊनच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या अध्यक्षपद हे रामटेक (Ramtek) विधानसभा मतदार संघाकडे आहे. अध्यक्षा रश्मी बर्वे यांची रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उपाध्यक्ष पद सावनेर विधानसभा मतदार संघाकडे आहे. या मतदार संघातून मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) स्वतः आमदार आहेत. सध्या ग्रामीण भागात दोन विधानसभा कॉंग्रेस, दोन भाजप तर एक राष्ट्रवादी व एक शिवसेनेकडे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे चित्र काहीसे उलट दिसण्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत मंत्री सुनील केदार यांच्या गटाचा दबदबा आहे. हिंगणा मतदार संघाकडे सभापती उज्ज्वला बोढारे व भारती पाटील यांच्या माध्यमातून दोन पदे आहेत. तर काटोल विधानसभा मतदार संघाकडे एकही सभापती नाही. सभापती पदाच्या निवडणुकीत यावेळी काटोल विधानसभेला प्रतिनिधित्व मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पद स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर कॉंग्रससुद्धा सध्यातरी त्यांना पद देणार नसल्याचे समजते. अशा परिस्थितीत शेकाप सदस्य समीर उमप यांची एका पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. हिंगणा मतदार संघातून कुंदा राऊत यांचा दावा पक्का समजला जात आहे. तर सावनेर मतदार संघातून सुमित्रा कुंभारे यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. येथून प्रकाश खापरेंकडून दावा करण्यात येत आहे. रामेटक विधानसभा मतदार संघातून दुधाराम सव्वालाखे हे प्रबळ दावेदार समजल्या जातात. तर विद्यमान अध्यक्ष रश्मी बर्वे या पुन्हा संधी मिळविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात येते.

Sunil Kedar
क्रीडा मंत्री सुनील केदार आता नागपुरातील ‘तो’ प्रयोग राज्यभर राबवणार...

कामठी मतदार संघातून सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे व नाना कंभाले दावेदार आहेत. नाना कंभाले यांनी थेट अध्यक्षपदावर दावा केला आहे. परंतु ते केदार विरोधी गटाचे असल्याने त्यांना पद मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. अध्यक्ष पदासाठी सव्वालाखेंचेही नाव चर्चेत आहे. अवंतिका लेकुरवाळे यांना एखादे सभापती पद मिळाल्यास तापेश्वर वैद्य यांच्याकडे सत्तापक्ष नेत्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. उमरेड मतदार संघातून अरूण हटवार, मिलिंद सुटे व डडमल यांच्या नावांची चर्चा आहे. अरूण हटवार हे उपाध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत. दुसरे पद नको असल्याची भावना त्यांनी काहींकडे व्यक्त करून दाखविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in