जिल्हा परिषद पोटनिवडणूक : ‘येथे’ शिवसेनेला मिळाली फक्त ८६ मते...

तालुक्यात सेनेचे कट्टर समर्थक समजले जाणारे देवेंद्र गोडबोले Devendra Godbole यांच्यासारखा नेता असताना चिरव्हा पंचायत समिती गणातून सेनेला फक्त ८६ मते मिळाल्याने ‘सैनिकांच्या’ निष्ठेवर प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे.
जिल्हा परिषद पोटनिवडणूक : ‘येथे’ शिवसेनेला मिळाली फक्त ८६ मते...
ZP Elections of Aroli, kodamendhiSarkarnama

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील चिरव्हा पंचायत समिती गणाचा निकाल लागताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या पायल पिकलमुंडे यांना ३९९५ मते मिळाली असून काँग्रेसच्या दुर्गा ठवकर यांना ३८४९ मते मिळाली. भाजपच्या पायल पिकलमुंडे यांचा १४६ मतांनी विजय झाला. सेनेच्या उमेदवार दुर्गा बांते यांना फक्त ८६ मतांवर समाधान मानावे लागले.

राज्यात महाविकास आघाडीची सरकार आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. याशिवाय तालुक्यात सेनेचे कट्टर समर्थक समजले जाणारे देवेंद्र गोडबोले यांच्यासारखा नेता असताना चिरव्हा पंचायत समिती गणातून सेनेला फक्त ८६ मते मिळाल्याने ‘सैनिकांच्या’ निष्ठेवर प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे. सेनेच्या बाबतीत शंका कुशंकेला पेव फुटले आहे. निकाल घोषित झाल्यानंतर आत्तापर्यंतही तालुक्यात याच चर्चा सुरू आहेत.

मागील निवडणुकीत काँग्रेसच्या दुर्गा ठवकर ह्या ९६० मतांनी निवडून आल्या होत्या. भाजपच्या नीलिमा घाटोळे यांचा त्यांनी पराभव केला होता. सेनेच्या ज्योती उके यांना ७०३ मते मिळाली होती. भाजपने उमेदवार बदलवून पायल पिकलमुंडे यांच्या हाती कमळ सोपविला. मात्र या निकालावरून सेनेची पिछाडी झाल्याने सेनेचा उमेदवार भाजपला पॅक झाला की सेनेच्या नेत्यांनी कारस्थान केले, या शंका घ्यायला पूर्ण वाव आहे. तालुक्यात रेवराल, खात आणि चिरव्हा या तीन पंचायत समितीच्या गणाकरिता निवडणुका घेण्यात आल्या होत्या. खात आणि रेवराल पंचायत समिती गणातून सेनेला चांगले मताधिक्य मिळाले. मात्र चिरव्हा गणातून सेनेला फक्त ८६ मते मिळाल्याने सेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली की आणखी काय घडले असावे, याचा शोध आता श्रेष्ठींना घ्यावा लागणार आहे.

ZP Elections of Aroli, kodamendhi
आमदार नीलेश लंके हे आर.आर. पाटलांची उणिव भरून काढणारे - अमोल मिटकरी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी भाजपने बारा बकऱ्याची पार्टी आयोजित केली होती. सेनेने बऱ्याच ठिकाणी बूथ देखील लावले नव्हते आणि भाजपच्या पायल पिकलमुंडे यांच्या विजयासाठी काम केल्याचेही सांगण्यात येते. भाजप आणि सेनेने एकत्रितपणे ताकद पणाला लावून भाजपच्या पायल पिकलमुंडे यांच्या विजयाचा नारळ फोडला. पक्षाने जरी बंडखोरी केली असली तरी सेनेचे कट्टर समर्थक असलेले ८६ मतदार यांना दाद देण्यापलीकडे आता दुसरे काहीच नाही.

Related Stories

No stories found.