उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि एनआयसीच्या तांत्रिकीत अडकला झरीचा कॅम्प !

यासंदर्भात यवतमाळचे (Yavatmal) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्‍वर हिरडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, झरी जामणी तालुक्यासाठी आपण नव्याने कॅम्प दिलेला आहे.
RTO Yavatmal
RTO YavatmalSarkarnama

नागपूर : विदर्भाच्या (Vidarbha) यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी हा आदिवासीबहुल तालुका. येथून तेलंगणाची सीमा जवळच आहे. त्यामुळेच की काय हा तालुका नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. तालुक्यातील अहेरअल्लीचे सरपंच छोटू राऊत (Chotu Raut) यांनी जनतेची परिवहन विभागातील कामे सुकर व्हावी, यासाठी येथे आरटीओने कॅम्प आयोजित करावा, अशी मागणी केली होती. पण ती अद्यापही पूर्ण झालेली नाही.

यासंदर्भात यवतमाळचे (Yavatmal) उपप्रादेशिक परिवहन (RTO) अधिकारी ज्ञानेश्‍वर हिरडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, झरी जामणी (Zari Jamani) तालुक्यासाठी आपण नव्याने कॅम्प दिलेला आहे. ३० जूनला आपण जिल्ह्यात घायच्या कॅम्पच्या यादीत झरी जामणीचा समावेश केलेला आहे. पण एनआयसीच्या पोर्टलवरून त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाहीये. एनआयसीला (नॅशनल इन्फरमेटीव्ह सेंटर) आपण पत्र पाठविले, फोनवर बोलणेही झाले आहे. आजही बोललो, आता त्यांच्या पातळीवर काय तांत्रिक अडचण आहे, हे कळायला मार्ग नाही. हा फक्त झरी जामणीचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) प्रॉब्लेम झालेला आहे.

वणीला जाण्याचा सल्ला..

एनआयसी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. हेल्प डेस्कवरसुद्धा माझे बोलणे झालेले आहे. झरी जामणीच्या लोकांना सांगितले की, आधी पोर्टलवर येऊ द्या त्यानंतर सर्व सुरळीत होईल. तांत्रिक अडचण आहे, हे एनआयसीने कबूल केले आहे. जुने सर्व कॅम्प नियमितपणे सुरू आहे, अडचण आहे ती नव्याने ॲड केलेल्या कॅम्पची. जोपर्यंत हा विषय निकाली निघत नाही, तोपर्यंत तातडीची कामे लोक वणीच्या कॅम्पमध्ये जाऊ करू शकतात, असेही ज्ञानेश्‍वर हिरडे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. वणीच्या कॅम्पला दोन किंवा चारच लोक असतात. त्यासाठी येथून अधिकारी, कर्मचारी पाठवणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे भविष्यात तो कॅम्प बंद करावा लागू शकतो, असेही ते म्हणाले.

माझ्या लोकांना त्रास झाल्यास जबाबदारी ‘त्याची’

माझ्या तालुक्यातील लोक तांत्रिक अडचणीच्या सबबी ऐकण्यासाठी बसलेले नाहीत. त्यांना त्यांची कामे हवी आहेत. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांसोबत चुकीचा पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे एनआयसीसोबतही चुकीचा पत्रव्यवहार केल्यामुळेही हा कॅम्प अडकला असण्याची शक्यता आहे. आरटीओच्या यवतमाळ कार्यालयाने झरी जामणीच्या तहसीलदारांना दिलेल्या पत्रात 'धामणी' असा उल्लेख केलाला आहे. प्रत्यक्षात आमच्या जिल्ह्यात धामणी नावाचा तालुका अस्तित्वातच नाहीये, असे सरपंच छोटू राऊत यांनी सांगितले. माझ्या तालुक्यातील लोकांना त्रास झाला आणि एखादी अनुचित घटना घडली, तर त्याला सर्वस्वी ज्ञानेश्‍वर हिरडे जबाबदार असतील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

RTO Yavatmal
सरपंच छोटू राऊत यांनी अहेरअल्लीला दिला एक दिवसाचा ग्रामसेवक…

एआरटीओ ४ वाजता गायब..

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शिस्त राहिलेली नाही. अधिकारी, कर्मचारी केव्हाही येतात आणि केव्हाही जातात. एआरटीओसारखा जबाबदार अधिकारी सकाळी उशिरा येऊन दुपारी ४ वाजताच कार्यालय सोडून जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून कर्मचारीच परस्पर कारभार उरकून टाकतात, आदी गंभीर आरोपही सरपंच राऊत यांनी केला. याच विषयावर त्यांनी मागील काळात आंदोलनही केले होते. कार्यालय सुरू होण्याची वेळ उलटूनही अधिकारी न दिसल्याने राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्च्या उचलून जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट म्हणून देण्यासाठी गेले होते. ते आंदोलन चांगलेच गाजले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com