राष्ट्रवादीने झटका दिला काँग्रेसला; पण घाम निघणार भाजपचा!

वंचित बहुजन आघाडीने पुंजाणी यांच्यासारखा जनाधार असणारा नेता गमावला.
ncp, bjp, congress
ncp, bjp, congresssarkarnama

वाशीम : वाशिम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या कारंजा मतदारसंघ जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचा ठरत आला आहे. याच कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादीने (Ncp) काँग्रेसला (Congress)धोबीपछाड देत युसूफ पुंजाणीचा (Yusuf Punjani) पक्षात प्रवेश घडवून आणला. हा रिसोड पंचायत समितीतील सत्ताकारणानंतर काँग्रेससाठी दुसरा झटका ठरला आहे. पुंजाणीच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या मतदारसंघाची राजकीय गणिते बदलली आहेत. तिरंगी लढतीत बाजी मारणाऱ्या भाजपला आता घाम गाळल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याची चर्चा मतदार संघात रंगली आहे. (Yusuf Punjani joins to NCP will change politics in Washim district)

ncp, bjp, congress
पाच नगर पंचायतीत शिवसेनेची डरकाळी घुमणार?

कारंजा मतदारसंघ कायम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा राहीला आहे. या मतदारसंघात माजी आमदार प्रकाश डहाके यांचा अपवाद वगळता मतदारसंघाबाहेरील दिग्गजांनीच नेतृत्व करून जिल्ह्याचे राजकारण त्यांच्या मुठीत ठेवल्याचा इतिहास आहे. यामध्ये माजी मंत्री अनंतराव देशमुख, बाबासाहेब धाबेकर, गुलाबराव गावंडे व विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होईल अशी अटकळ असतानाच पुंजाणी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या साथीने दुसऱ्या क्रमांकाची मते घेवून भाजपचा विजय सूकर केला होता.

नगर परिषद निवडणुकीतही पुंजानी वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने कारंजा, मानोरा व मंगरूळपीर नगर परिषद त्यांनी जिंकल्या. मात्र, वंचित बहुजन आघाडीने पुंजाणी यांच्यासारखा जनाधार असणारा नेता गमावला. सहा महिन्यापूर्वी पुंजाणी यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेस साखरझोपेत असताना राष्ट्रवादीने त्याचा हा मोहरा गळाला लावल्याने आता या मतदारसंघाच्या राजकीय गणितांची फेरमांडणी करावी लागणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक्झीट घ्यावी लागणार आहे. सामना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, असा असला तरी तिरंगी लढतीवर दारोमदार असलेल्या भाजपला दुरंगी लढतीची तयारी करावी लागणार आहे.

ncp, bjp, congress
इच्छूक गॅसवर; गट आणि गणांची मोडतोड डोकेदु:खी वाढविणार

नगर परिषद निवडणूक ठरणार निर्णायक

चार महिन्यात जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकीचा बिगूल वाजणार आहे. मागील नगर परिषद निवडणुकीत युसूफ पुंजानी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दाखवून दिलेली मतांची टक्केवारी राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार आहे. यामुळे काँग्रेसला आता मुस्लिम मतांवर पाणी सोडावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com