कालच्या संपाचा जिल्ह्याला असा बसला फटका, फक्त ११३० मेगावॅग युनिट वीज निर्मिती...

Nagpur : काल पहिल्याच दिवशी संपाचा फटका नागपूर जिल्ह्याला बसला.
कालच्या संपाचा जिल्ह्याला असा बसला फटका, फक्त ११३० मेगावॅग युनिट वीज निर्मिती...

MSEB workers strike : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरुद्ध कालपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता. काल पहिल्याच दिवशी संपाचा फटका नागपूर (Nagpur) जिल्ह्याला बसला. अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्याला कर्मचाऱ्यांचा विरोध होता.

अदानी (Adani) कंपनीला समांतर वीज पुरवठ्याचा परवाना देण्याला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. हिवाळी अधिवेशनावर (Winter Session) मोर्चा नेल्यानंतरही सरकारने (State Government) न ऐकल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर काल संपाचे हत्यार उपसले. नागपूर शहरानजीकच्या कोराडी आणि खापरखेडा केंद्रातील संच काल बंद होते. २१० मेगावॅटचे ३ संच काल सायंकाळपर्यंत बंद होते. तर कोराडी केंद्रातील ५०० मेगावॅटचा १ संच बंद होता. त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या विविध भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी संप मागे घेतल्याने कर्मचारी कामावर परतले. अन्यथा संपाच्या परिणामामुळे राज्य अंधारात जाण्याची शक्यता होती. संपात ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले होते.

तिन्ही वीज कंपन्यांतील हजारो कामगार मंगळवारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी झाल्याने काल बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोराडी आणि खापरखेडा वीजनिर्मिती केंद्रातून केवळ १ हजार ६३० मेगावॅग युनिट वीज निर्मिती झाली. खापरखेड्यात ५०० मेगावॅट युनिटचा एक संच सुरू होता तर २१० मेगावॅट युनिटचे तीन संच बंद होते. तसेच कोराडी वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅटचा १ संच बंद होता. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ११३० मेगावॅग युनिट वीज निर्मिती झाली. कोराडी येथे ११७८ तर खापरखेड्यात ५३६ मेगावॅट वीज निर्मिती झाली. रोजच्या तुलनेत वीज निर्मिती कमी झाली होती.

शहर आणि ग्रामीण भागाचा विचार केल्यास दररोज एक हजार मेगावॅग युनिट विजेची मागणी असते. मागणीनुसार वीज निर्मिती केली जाते. संपामुळे रात्रीपासून वीज निर्मितीवर परिणाम झाला होता. संप मागे घेतल्यानंतर दुपारच्या शिफ्टचे कर्मचारी कामावर रुजू झाले. सायंकाळपासून मागणीनुसार वीज निर्मितीला युद्धपातळीवर सुरुवात झाली. वीज केंद्राचे खासगीकरण करणार नसल्याचा लेखी करार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झाल्याने हा संप मागे घेण्यात आला. त्यानंतर संविधान चौकातील आंदोलनस्थळावरून आम्ही कामावर परतलो, असे संघर्ष समितीचे संयोजक अब्दुल सादिक यांनी सांगितले.

कालच्या संपाचा जिल्ह्याला असा बसला फटका, फक्त ११३० मेगावॅग युनिट वीज निर्मिती...
Lonand : सीओंच्या दालनात गोंधळ; कर्मचारी संघटनेने केला निषेध

राज्यात १५ हजार २५६ मेगावॅटची निर्मिती..

कोराडी- ११७८, खापरखेडा- ५३६, चंद्रपूर-१४१६, नाशिक- २७१, परळी- २६०, भुसावळ-८०६, महाजेनकोने ६ हजार ११८ तर खाजगी कंपनीकडून- ७ हजार ६१५ मेगावॅटची वीज निर्मिती साडेसहा हजार मेगावॅट युनिटची तूट भरून काढण्यासाठी कामगार कामाला लागले. दरम्यान राखीव विजेचा वापरही करण्यात आला.

चिंतेश्वर येथे वीज रोहित्र जळाल्याने रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. वर्धमाननगर येथे काल एक तास वीज नव्हती. तसेच ग्रामीण भागातील मोहपा, पारशिवनी, सावनेर, गोंडखैरी या भागात तीन तास वीज पुरवठा खंडित होता. कामठी, रामटेक, मौदा, कापसी, महालगाव १० तास वीज पुरवठा खंडित झाला होता. काटोल, सावरगाव आणि थडीपवनी येथे २ तास वीज नव्हती. समितीने संपाची घोषणा केल्यानंतर कोराडीच्या औष्णिक वीज केंद्रात मध्य प्रदेशातील अभियंते बोलाविण्यात आले होते. मात्र, येथेही कर्मचारी-अधिकारी व अभियंते संपावर असल्याने त्यांनी बाहेरील राज्यातून आलेल्या अभियंत्यांना वीज केंद्राच्या आत जाऊ दिले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com